अंबानीचं 'प्री वेडिंग सेलिब्रिशन', बॉलिवूड कलाकारांचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 04:19 PM2019-02-26T16:19:45+5:302019-02-26T16:34:13+5:30

मुकेश अंबानीचा थोरला मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांच प्री वेडिंग सेलिब्रेशन स्वत्झर्लंडमध्ये सुरू झाले आहे.

या सेलिब्रेशन सोहळ्यासाठी अंबानींचे संपूर्ण कुटुंब स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले आहे.

या सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडच्या दिग्गजांनीही हजेरी लावली आहे. या सोहळ्यात आकाश आणि श्लोका एका अँटीक बग्गीची सवारी करताना दिसून येत आहेत.

उंचच उंच पाळणे आणि स्वित्झर्लंडचे थंड हवामान या फोटोत दिसून येत आहे.

आकाशच्या प्री विडिंग सेलिबेशन सोहळ्यात अंबानी कुटुंबीयातील नातेवाईकांनी डान्स करुन जल्लोष साजरा केला.

येथे अभिनेता रणबीर कपूर, करण जोहर आणि अर्जुन कपूर यांचीही एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले.

अंबानी कुटुंबीय हे स्वित्झर्लंडमधील फाईव्ह स्टार हॉटेल बैडरट पॅलेस येथे उतरले आहेत.

आकाश अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड तारका विद्या बालन अन् जॅकलिन फर्नांडिस याची पोहोचल्या आहेत.