Hotel Bhagyashree : अर्ध्या तासात ७५ हजार रुपये कमावतात 'हॉटेल भाग्यश्री'चे मालक? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:23 IST2025-07-24T13:13:54+5:302025-07-24T13:23:50+5:30

Hotel Bhagyashree : धाराशिव जिल्ह्यातील 'हॉटेल भाग्यश्री' या हॉटेलची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Hotel Bhagyashree : मराठी माणसाने उद्योग, व्यवसाय सुरू करुन त्यामध्ये यशस्वी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सध्या सोशल मीडियावर धाराशिव जिल्ह्यातील 'हॉटेल भाग्यश्री' या हॉटेलची जोरदार चर्चा आहे.

या मराठी हॉटेल व्यावसायिकाने यशस्वी होऊन दाखवले. या व्यावसायिकाचे नाव नागेश मडके असं आहे. त्यांनी इस्टाग्रामचा पुरेपुर वापर केला आहे.

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे कायम ट्रोल होतात ते त्यांच्या दांड्या मारण्याच्या कारणामुळे. अधी अमूक कारण तर कधी तमूक कारणाने बंद असतं.

हे हॉटेल नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे. या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

या हॉटेलच्या व्यवसायावर नागेश मडके यांनी फॉर्च्युनर गाडी खरेदी केली आहे. तसेच त्यांनी संरक्षणासाठी बॉडीगार्ड नेमले आहेत.

फक्त २५० रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी, झणझणीत चव, आणि मालकाची अनोखी मार्केटिंग स्टाईल यामुळे हे हॉटेल चर्चेचा विषय बनलं आहे.

पण याबरोबरच वादविवाद, तोडफोड आणि हाणामारीच्या घटनांमुळेही हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत आहे.

दोन दिवसापूर्वी 'हॉटेल भाग्यश्री' बाबत एक माहिती व्हायरल झाली आहे. त्या हॉटेलमधील होत असलेल्या बिझनेसची माहिती होती.

त्यांनी रविवारी २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी एकाचवेळी ३०० माणसे जेवायला बसली आहेत. एका थाळीची किंमत २५० रुपये आहे. पूर्ण हिशोब केला तर या ३०० थाळी मधून त्याला तब्बल ७५००० रुपये मिळतात.

फक्त अर्ध्या तासात हा व्यक्ती ७५००० कमवतो. एका थाळीमागे पन्नास रुपये जरी प्रॉफिट पकडले तरी अर्ध्या तासांमध्ये तो १५००० रुपये कमावतो, असा दावा करण्यात येत आहे.

तर काल हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली.