1 / 7महिलाविरोधातील गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून, धक्कादायक म्हणजे घरातच अधिक छळ होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. देशात हुंड्यासाठी अजूनही मारहाण होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे एकूण ७,६९८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये घरगुती हिंसा, मारहाण आणि गुन्हेगारी धमक्या या तक्रारी सर्वाधिक आहेत.2 / 7उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. देशातील एकूण तक्रारीरींपैकी ५० टक्के तक्रारी उत्तर प्रदेशातून आल्या आहेत.3 / 7आता आकडेवारीवर नजर टाकली तर दिसते की जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात ७ हजार ६९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील १५९४ तक्रारी घरातच मारहाण झाल्याच्या आहेत. त्यानंतर ९५० मारहाणीच्या, तर ३९४ बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आहेत.4 / 7३०२ तक्रारी या लैंगिक छळ केल्याच्या आहेत. जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या ९८९, हुंडाबळीच्या ९१६, ३१० विनयभंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.5 / 7महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी वाढती जागरूकता आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गाविषयी माहिती वाढल्यामुळे तक्रारी वाढल्या असाव्यात.6 / 7मागील वर्षी आयोगाच्या पोर्टलवर २५,७४३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यातील सन्मानाने जगण्याचा अधिकार, घरगुती हिंसा आणि हुंडाबळी या तक्रारी सर्वाधिक होत्या.7 / 7महिलांच्या छळाच्या, बलात्काराच्या आणि इतर स्वरुपाच्या छळाच्या तक्रारी राज्यनिहाय बघायला गेलं, तर सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातील ३९२१ इतक्या आहेत. त्यानंतर दिल्ली ६८८, महाराष्ट्र ४७३, हरयाणा ३०६, बिहार ३४ या राज्यांचा क्रमांक लागतो.