शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इथेच विकास दुबेचा खेळ संपला; पाहा घटनास्थळाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:05 PM

1 / 8
कानपूरमधील ८ पोलिसांच्या हत्याकांडाचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचा शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला गोळ्या झाडल्या.
2 / 8
२ जुलै रोजी कानपूरमध्ये पोलिसांची हत्या केल्यानंतर विकास दुबे फरार झाला होता. कानपूरहून फरीदाबाद, तिथून उज्जैन असा प्रवास त्याने केला. मागील ७ दिवसांपासून विकास दुबे फरार होता.
3 / 8
विकास दुबेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून काही सामान जप्त करण्यात आलं होतं, फरार असताना तो त्याच्यासोबत एक बॅग घेऊन फिरत होता. सूत्रांच्या माहितीनुसार या बॅगेत काही कपडे, मोबाईल फोन, चार्जरसह महत्त्वाची कागदपत्रेही होती.
4 / 8
याच मोबाईल फोनमधून तो अनेकांच्या संपर्कात होता. फोनवर बोलल्यानंतर तो मोबाईल स्विचऑफ करत असे. या फोनमधून त्याने वकिलांशी, त्याच्या निकतवर्तीयांच्या संपर्कात होता. विकास दुबेकडे बनावट आयडी कार्डही सापडलं आहे.
5 / 8
कानपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, चकमकीदरम्यान विकासला चार गोळ्या लागल्या. यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचे शवविच्छेदन सुरू आहे.
6 / 8
कानपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, चकमकीदरम्यान विकासला चार गोळ्या लागल्या. यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचे शवविच्छेदन सुरू आहे.
7 / 8
एन्काऊंटरनंतर पोलिसांनी आपल्या निवेदनात सांगितले होते, की विकास दुबे पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जात होता. यावेळी त्याला सरेंडर करण्यासाही सांगण्यात आले. मात्र, त्याने ऐकले नाही. म्हणून त्याला रोखण्यासाठी गोळी चालवावी लागली.
8 / 8
यावेळी गोळी त्याच्या कमरेवर लागल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र, जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या छातीत लागलेली गोळी स्पष्टपणे दिसत होती.
टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश