शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 5:08 PM

1 / 5
बिहारच्या बेगूसरायमध्ये भाडेकरू म्हणून आलेल्या एका युवतीचे 3 वर्षांपासून एका पुरुषाशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, जेव्हा युवतीला अकाऊंटंटमध्ये नोकरी मिळाली तेव्हा तिने तरूणाशी लग्नही केले. नंतर नववधू लाखोंच्या किंमतीचे दागिने व रोकड घेऊन वधू पतीच्या घरातून पळून गेली. एवढेच नव्हे तर आता ही मुलगी आपल्या पतीला जिवे मारण्याची धमकीही देत आहे. हे सर्व आरोप पीडित पतीने केले आहेत. पीडित पुरुषाने मुलीविरूद्ध पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देखील दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
2 / 5
संपूर्ण प्रकरण बेगूसराय शहरातील लोहिया नगर परिसरातील आहे. येथे राहणारा 25 वर्षीय अनुराग कुमार आपल्या पत्नीविरूद्ध तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले आहे. लग्नानंतर लाखोंची लूटमार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्याने पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग कुमार म्हणाले की, चार वर्षांपूर्वी तेतरी डंडारी येथे राहणारी मौसम कुमारी त्याच्या भाडेकरू म्हणून त्यांच्या घरी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले.
3 / 5
अनुराग कुमार यांनी सांगितले की, दरम्यान, मौसम कुमारी यांना पंचायती राज विभागात लेखापाल म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी भागलपूरमधील एका मंदिरात एप्रिल 2019 मध्ये लग्न केले. अनुराग म्हणाले की, भाडेकरू म्हणून राहत असताना, कुमारीच्या अभ्यासाखेरीज इतर सर्व खर्च पाहत होता. लग्नानंतर मौसम कुमारी अनुरागबरोबर तिच्या घरी राहिली आणि लाखो रुपयांचे दागिने आणि इतर सामानाची खरेदी केली.
4 / 5
असा आरोप केला जात आहे की, जानेवारी २०२० मध्ये मौसम कुमारी आपल्या आईची तब्येत ठीक नसल्याचे सांगत ती माहेरी निघून गेली, त्यावेळेची मौसमने पतीच्या घरातून 60 ग्रामचे दागिनेही सोबत घेतले. माहेरी गेल्यानंतरही तिने तिच्या पतीकडून सुमारे एक लाख रुपये दोन वेळा खात्यात मागवून घेतले. नवरा वारंवार तिला घरी नेण्यात सांगूनही ती टाळत राहिली. पण आता तिने अनुरागला फोनवर परत कधीही न येण्याचं सांगितले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
5 / 5
या धमकीनंतर अनुराग कुमार लोहियानगर ओपी पोलिस ठाण्यात 'बायको' विरुद्ध तक्रार देण्यासाठी आला. या प्रकरणात मुख्यालयाचे डीएसपी कुंदनकुमार सिंह म्हणाले की, अनुराग कुमार यांनी लग्नाच्या पुराव्यासह अर्ज दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. अर्जामध्ये अनुराग कुमार यांनी पंचायती राज विभागातील लेखापाल मौसम कुमारी यांनी प्रेम प्रकरणात लग्न केल्याबद्दल आणि लग्नानंतर दागिने व पैशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पोलिस सर्व गोष्टींचा शोध घेत आहेत, त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस येईल. (All Photo - Navbharat Times)
टॅग्स :fraudधोकेबाजीmarriageलग्नBiharबिहार