कोडे सुटेना! १०० कोटींचा घोटाळा उघड करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची मर्डर मिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 04:51 PM2023-09-12T16:51:02+5:302023-09-12T16:54:38+5:30

पंजाब FDA ची ३६ वर्षीय अधिकारी नेहा शौरी हत्या प्रकरणी अद्याप त्यांचे कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. साडेचार वर्षापूर्वी नेहाची गोळी मारून हत्या केली होती. परंतु आजपर्यंत कुटुंबाला न्याय मिळाला नाही. नेहाचे कुटुंब तिच्या हत्येची नव्याने तपास करण्याची मागणी करत आहे. नेहा ही १९७१ युद्धातील अनुभव कॅप्टन कैलाश कुमार शौरी यांची मुलगी होती.

२०१९ मध्ये पंजाब एफडीएतील अधिकारी नेहा सौरी मोहालीच्या कार्यालयात तैनात होती. पंजाब पोलिसांनी तिच्या हत्येच्या तपासात दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. या भयंकर हत्याकांडामागचे प्रमुख आरोपीला अटक झाली असती. परंतु पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट देत हल्लेखोर बलविंदर सिंह याच्याशिवाय कुणीही व्यक्तीविरोधात पुरावे सापडले नाहीत असं म्हटलं. बलविंदरने २९ मार्च २०१९ ला नेहा शौरीची हत्या करून स्वत:ला गोळी मारली होती.

एफडी अधिकारी नेहा शौरीने १४ जुलै २०१८ रोजी तत्कालीन ड्रग कंट्रोलरला अंतर्गत रिपोर्ट सादर केला होता. ज्यात व्यसनमुक्ती केंद्र आणि अन्य औषधांचा दुरुपयोग होत असल्याची माहिती होती. हाच रिपोर्ट तिच्या मृत्यूचे कारण बनला असं तिचे आई वडिल मानतात. कारण भ्रष्ट राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि खासगी व्यसनमुक्ती केंद्र यांच्यातील हे लागेबंधे होते. त्यातून औषधे विकून पैसे कमावले जायचे.

२०१९ ला तपासात पंजाबच्या २३ खासगी व्यसनमुक्ती केंद्राने विना कुठल्या रेकॉर्डशिवाय १०० कोटींची मुल्याची ५ कोटी ब्यूप्रेनोर्फिन औषधे विकली होती. या औषधाचा दुरुपयोग झाला होता. कारण ब्यूप्रेनोर्फिन ओपिओइड एगोनिस्ट आहे. त्याचा प्रभाव शरीरावर पडतो. उपचारासाठी आलेले १७ टक्के गर्दुले या औषधाचे व्यसन आहे.

तत्कालीन काँग्रेस सरकारवर ब्यूप्रेनोर्फिनचा दुरुपयोग होत असल्याचे प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. कथित प्रकरणी तपास यंत्रणांनी ईडीला सहकार्य करण्यास नकार दिला. राज्य सरकारने ब्यूप्रेनोर्फिन खरेदी आणि वितरण दस्तावेज सोपवण्यास नकार दिला. केंद्रीय तपास यंत्रणांची दिशाभूल कऱण्यासाठी औषधांच्या आकडेवारीत फेरफार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण विधानसभेतही गाजले होते.

पंजाब पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही असा आरोप करत नेहा शौरीच्या आई वडिलांनी कोर्टाकडे दाद मागितली. हे प्रकरण सीबीआयला सोपवावे अशी त्यांची मागणी होती. आतापर्यंत या प्रकरणी २०-२२ वेळा सुनावणी झाली परंतु बहुतांश वेळा सुनावणी पुढे ढकलली गेली असं तिच्या वडिलांनी म्हटलं.

नेहाचे वडील कॅप्टन शौरींचा दावा आहे की, आम्ही कोर्टात हा डबल मर्डर असल्याचे सांगितले. नेहाला बलविंदर सिंगने मारले त्यानंतर बलविंदरला अन्य कुणी मारून टाकले. दोन वेगवेगळ्या शस्त्रांनी ही हत्या झाल्याचे पुरावे आहेत. पीडिता आणि आरोपी यांच्यावरील जखमांच्या खूणा आणि हत्यारे वेगवेगळी आहेत असा त्यांनी कोर्टात म्हटलं.

त्याचसोबत नेहा शौरी हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास संशयास्पद आहे. आरोपीने स्वत: मारण्यासाठी २ गोळ्या चालवल्या परंतु एका गोळीत व्यक्ती मरतो. दुसरी गोळी कशी चालवू शकतो. नेहाच्या शरीरावर ८ खूणा आहेत. मग ४ गोळ्यांचे ८ निशाण कसे बनू शकतात हे कल्पनेच्या पलीकडचे आहे असं वडिलांनी आरोप केला आहे.

नेहाच्या कुटुंबाने पोलीस चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केलेत. नेहा आणि आरोपीला मारणाऱ्या अनेक गोळ्या गायब आहेत. नेहाचा मोबाईल फोन, लॅपटॉप डेटा नष्ट केला आहे. नेहाच्या मोबाईल फोनमधील सीमकार्डही गायब आहे. पोलिसांनी पीडित आणि आरोपी यांच्यातील फोन संवादही जाहीर केला नाही असं कुटुंबाने सांगितले.

आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एसआयटी बनवली. आम्हाला पंजाब पोलिसांवर भरवसा नाही. त्यांनी आम्हाला खोटी आश्वासने दिली. आम्हाला पोलिसांनी दोनदा बोलावले तेव्हा तथ्य मागितले, माझ्या मुलीला दिवसाढवळ्या मारले गेले परंतु एकालाही अटक केली नाही असा टाहो नेहा शौरीच्या आईने फोडला.