By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:51 IST
1 / 9मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरण सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्याचीच पत्नी सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर आणि मित्रांच्या मदतीने राजाची हत्या केली. तिने लग्नानंतर केवळ ५ दिवसांतच त्याच्या रक्ताचा सौदा केला.2 / 9राज आणि सोनम यांचे लग्न 11 मे रोजी झाले होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होते. मात्र, 16 मे रोजी सोनमने आपला प्रियकर राज कुशवाहच्या साथीने राजाचा काटा काढण्याची योजना आखली.3 / 9'मी विधवा होऊन तुझ्यासोबत लग्न करीन - राजाच्या हत्येची कहाणी एवढी खतरनाक आहे की, ती कुणालाही सुन्न करेल. राजाची पत्नी सोनम राज कुशवाहला म्हणाली होती, 'राजाला संपवू आणि लुटीची स्टोरी तयार करू. यानंतर मी विधवा होईल आणि मग माझे वडील आपल्या लग्नाला परवानगी देतील.' 4 / 9हत्येसाठी ऑनलाईन मागवली होती कुऱ्हाड - राजाच्या हत्येसाठी कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला होता. ती कुऱ्हाड गुवाहाटी येथून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आली होती. आरोपी घटनेपूर्वी सोनमच्या होमस्टेपासून 1 किमी अंतरावरील एका हॉटेलमध्ये थांबले होते. सोनमच त्यांना लोकेशन पाठवत होती.5 / 9सोनम ओरडताच हत्या... - २३ मे रोजी सोनम राजाला फोटोशूटच्या बहाण्याने एका निर्जन डोंगराळ भागात घेऊन गेली. ती स्वतः मागे राहिली आणि तीन तरुण राजाच्या पुढे गेले. जागा खाली दिसताच सोनम ओरडून म्हणाली, 'मार दो इसे' (याला मारून टाका).' 6 / 9यानंतर, आरोपी विशाल चौहानने राजाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी आकाश राजपूत दुरूनच लक्ष ठेऊन होता.7 / 9हत्येसाठी 20 लाखांचे आमिष - चौकशी दरम्यान आरोपी म्हणाले, ते डोंगर चढून थकले होते आणि त्यांनी नकार दिला होता. तेव्हा सोनमने म्हणाली '20 लाख देईन, पण मारावे लागेल.' त्याच वेळी राजाच्या पर्समधून 15 हजार रुपये काढून त्यांना देण्यात आले होते.8 / 9हत्येनंतर फिल्मी अंदाजात फरार - राजाची हत्या 23 मे रोजी झाली होती. त्याच दिवशी सायंकाळी सोनम शिलॉन्गवरून गुवाहाटीला पोहोचली. यानंतर, ती तेथून ट्रेनने वाराणसीमार्गे गाजीपूरला गेली. दरम्यान तिने पोलिसांना ट्रेस करता येऊ नये, म्हणून आपला मोबाईलही तोडून टाकला होता.9 / 9प्रियकर सापडला अन् खेळ खल्लास... - तपासादरम्यान सोनमचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यात ती आरोपीशी बोलताना दिसत होती. यानंतर सीडीआर आणि कॉल ट्रेसिंगनंतर राज कुशवाहाचे लोकेशन इंदूरमध्ये सापडले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. प्रियकराच्या अटकेची बातमी सोनमला समजताच, खेळ संपल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर, ती उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर पोहोचली. तेथेच पोलिसांनी तिला अटक केली..