Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:24 IST
1 / 7श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केली. 2 / 7श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करुन आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. दिल्ली पोलिसांनी याचा तपास केला आणि अखेर आफताबला अटक झाली. 3 / 7आता तीन वर्षे झाली तरी श्रद्धा वालकरवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाही. याचीच दखल घेत न्यायालयाने सर्व पक्षांना आवश्यक साहित्यासह नियोजित तारखांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जेणेकरून हा खटला जलदगतीने पुढे नेता येईल. 4 / 7श्रद्धाची तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनवालाने १८ मे २०२२ रोजी दिल्लीतील मेहरौली येथे हत्या केल्याचा आरोप आहे. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पीटीसी) हरगुरविंदर सिंग जग्गी यांनी १७ ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश दिला आहे. 5 / 7आदेशानुसार, प्रकरणाची संवेदनशीलता आणि मृत/पीडितेवर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत हे लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व पक्षांना नियोजित तारखांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 6 / 7न्यायालयाने ११, १२, १४ आणि १५ नोव्हेंबर दुपारी २ वाजता या खटल्याची सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. आरोपीने न्यायाधीशांसमोर कबूल केलं की त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली होती.7 / 7दिल्लीच्या साकेट कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान आफताबने न्यायाधीशांना सांगितलं की, 'मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं आहे.' या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.