शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Cime news UP: धक्कादायक! महिलेची आपबीती; गेल्या 31 वर्षांपासून दोन मालकांकडून सामुहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 23:45 IST

1 / 7
गुडगावच्या सेक्टर 37 मध्ये एका कंपनीच्या दोन मालकांवर तिथे काम करणाऱ्या महिलेने गंभीर आरोप केले आहेत. गेल्या 31 वर्षांपासून गँगरेप (Gangrape on women) करत होते असा आरोप तिने केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला तिथे गेली कित्येक वर्षे काम करत आहे.
2 / 7
या महिलेने अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या मालकांनी तिच्या पतीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला गप्प केले होते, असे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या मालकांच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिला पोलिस ठाण्यात सामुहिक बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 / 7
पोलिसांनुसार पीडितेने सांगितले की तिचे लग्न 1990 मध्ये झाले होते. पती तिला उत्तर प्रदेशहून गुडगावला घेऊन गेला. सेक्टर 37 च्या एका फॅक्टरीमध्ये तिचा पती मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. फॅक्टरीच्या मालकांनी त्यांना आारातच एक खोली राहण्यासाठी दिली. त्याच्या शेजारीच फॅक्टरी मालक ओमप्रकाश शर्मा आणि त्याचा भाऊ सतीश शर्मा याचे ऑफिस होते. महिलेला त्यांनी ऑफिसच्या स्वच्छतेसाठी कामावर ठेवले.
4 / 7
महिलेच्या आरोपांनुसार 5 ऑगस्ट 1990 मध्ये पहिल्यांदा तिच्यावर ओमप्रकाशने बलात्कार केला. तिने याची तक्रार सतीशकडे केली. त्यावर त्याने याबाबत कोणाला सांगू नकोस असे बजावले. यानंतर त्यानेही धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
5 / 7
यानंतर हे नेहमीचेच झाले. दोघेही तिच्यावर बलात्कार करत होते. या दरम्यान महिला गर्भवती राहिली. तिचा गर्भपातही करण्यात आला. 17 नोव्हेंबर 2017 ला या महिलेने ओमप्रकाशला सांगितले की ती आता त्याच्या कुटुंबाला सर्व सांगणार आहे. त्यावर त्याने आपण विष पिऊन आत्महत्या करेन आणि चिठ्ठीवर महिला आणि तिच्या पतीचे व मुलाचे नाव लिहिन अशी धमकी दिली. यामुळे तिघांनाही जेल होईल अशी भीती घातली. यामुळे महिला घाबरली.
6 / 7
यानंतर सतीशने 27 नोव्हेंबरला तिच्य़ावर पुन्हा बलात्कार केला. महिला जेव्हा त्याला विरोध करू लागली तेव्हा त्यांनी तिच्या पतीला कारण सांगून तिला गावी पाठवून देण्यास भाग पाडले. गावाहून आल्यावर पुन्हा तिच्यासोबत तेच होऊ लागले. यामुळे महिला पतीसोबत एका भाड्याच्या घरात राहू लागली. परंतू आरोपी तरीही तिला त्रास देत होते.
7 / 7
यामुळे अखेर तिने कंटाळून पोलिस ठाणे गाठले. बुधवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस ठाण्याचे एसएचओ पूनम सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. महिलेने खूप वेळाने तक्रार दिली आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस