तीन दिवस बायकोकडे, तीन दिवस प्रेयसीकडे; पण 'असा' तुटला करार अन् पती झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 11:10 IST
1 / 12अनिल कपूरच्या जुदाई सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, दोन महिला एका पती वाटून घेतात. मात्र, खऱ्या आयुष्यात अशा घटना कमीच घडतात. 2 / 12पण अशी एक घटना समोर आली आहे. झारखंडच्या(Jharkhand) रांचीमधून(Ranchi) अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. 3 / 12इथे एका व्यक्तीला पत्नी आणि गर्लफ्रेन्डमध्ये दोघींच्या सहमतीने वाटून देण्यात आलं आहे. 4 / 12या करारानुसार, ही व्यक्ती आठवड्यातील ३ दिवस पत्नीसोबत आणि बाकीचे ३ दिवस गर्लफ्रेन्डसोबत राहणार. तो एक दिवस सुट्टी घेऊ शकतो आणि तो त्याच्या मर्जीने जीवन जगू शकतो.5 / 12झारखंडच्या रांचीमद्ये राहणाऱ्या राकेश मेहता विवाहित असूनही एका दुसऱ्या तरूणीसोबत फरार झाला होता. त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डला त्याचं लग्न झाल्याचं सांगितलं नव्हतं. 6 / 12यानंतर त्याच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. तर त्याच्या गर्लफ्रेन्डच्या कुटुंबियांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. 7 / 12जेव्हा पोलिसांनी राकेश आणि त्याच्या गर्लफ्रेन्डला पकडून आणलं तेव्हा हे प्रकरण समोर आलं.8 / 12राकेशचं लग्न झालं असं समजल्यावर त्याच्या गर्लफ्रेन्डने पोलीस स्टेशनमध्ये एकच गोंधळ घातला आणि तिने सांगितलं की, दोघांनी लग्न केलंय. 9 / 12यानंतर पोलिसांच्या समोरच तीन-तीन दिवसांचा हा अनोखा करार करण्यात आला. 10 / 12मात्र, हा करार काही दिवसच टिकू शकला आणि दुसऱ्या पत्नीने लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला. यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. पोलीस आता राकेशला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.11 / 12कोर्टातून राकेशच्या अटकेचं वॉरन्ट जारी झाल्यानंतर पोलीस छापेमारी करत आहे. पण आता त्याच्या बचावासाठी त्याची पहिली पत्नी समोर आली आहे. 12 / 12आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा पोलीस राकेशला अटक करण्यासाठी घरी पोहोचले तेव्हा तिनेच त्याला पळून जाण्यास मदत केली.