शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:51 IST

1 / 10
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याप्रकरणात मेघालय पोलिसांनी न्यायालयात ७९० पानांचं आरोपपत्र सादर केलं आहे. यामध्ये खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. सोनम रघुवंशीनेच लग्नानंतर हनिमूनला जाऊन आपल्या नवऱ्याचा काटा काढल्याचं समोर आलं.
2 / 10
सोनमसोबत तिचा प्रियकर राज कुशवाह आणि आकाश सिंह राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी असे तीन कॉन्ट्रॅक्ट किलर होते. मेघालय पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, २३ मे रोजी विशाल सिंह चौहानने सोहराजवळील सेल्फी पॉइंटवर राजावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका प्राणघातक होता की राजा वेदनेने तडफडू लागला आणि खूप रक्तस्त्राव होऊ लागला.
3 / 10
तिन्ही खुनी राजाच्याभोवती उपस्थित होते आणि त्याची पत्नी सोनम थोड्या अंतरावर उभी होती. राजा विनवणी करत होता, पण सोनमने त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर विशालने सतत हल्ला करून राजाला मारलं आणि राजाचा जागीच मृत्यू झाला.
4 / 10
यानंतर सोनम परत आली आणि तिने 'तो जिवंत आहे की मेला?' असा प्रश्न विचारला. यानंतर सोनमने तिन्ही मारेकऱ्यांसह पतीचा मृतदेह उचलून दरीत फेकून दिला. याआधी सोनमचे तिच्या पतीला मारण्याचे तीन प्रयत्न अयशस्वी झाले होते.
5 / 10
पहिला प्रयत्न २१ मे रोजी गुवाहाटीत झाला होता. तिन्ही मारेकरी आधीच तिथे पोहोचले होते, परंतु निर्जन जागा न मिळाल्याने प्लॅन अयशस्वी झाला. त्यानंतर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याला दरीत ढकलून देण्याचा दुसरा कटही रचण्यात आला. पावसाने सोनमचा हा कटही उधळून लावला.
6 / 10
तिसऱ्या प्रयत्नात राजाला स्कूटीवर एका निर्जन ठिकाणी नेऊन हल्ला करायचा होता, परंतु स्थानिक लोक तिथे उपस्थित होते आणि भीतीमुळे कट अपूर्ण राहिला. या सर्व कटांची पटकथा सोनम आणि राज कुशवाह यांनी एकत्रितपणे लिहिली होती असं आरोपपत्रात म्हटलं आहे.
7 / 10
राज इंदूरहून फोनवर सतत मार्गदर्शन करत होता. राजाला मारल्यानंतर आरोपी निघून गेले. बुरखा घालून सोनम टॅक्सीने गुवाहाटीला गेली आणि नंतर २५ मे रोजी वेगवेगळ्या शहरांमधून इंदूरला पोहोचली. प्रत्यक्षात सोनमचा प्लॅन काही दिवस लपून राहण्याचा होता.
8 / 10
२ जून रोजी राजाचा मृतदेह दरीत सापडला. इंदूरमध्ये लपून बसलेली सोनम सोशल मीडियावर लक्ष ठेवून होती. तिचा हेतू काही दिवसांनी सिलीगुडी मार्गे मेघालयला जाऊन ड्रग्ज आणि अपहरणाची खोटी कहाणी रचण्याचा होता. पण पोलिसांनी ८ जून रोजी आकाश याला अटक केली.
9 / 10
ही बातमी मिळताच राज कुशवाह आणि सोनम दोघेही घाबरले. सोनमचा पुढचा प्लॅन बदलला आणि ती गाझीपूरला निघून गेली. वाराणसीहून गाझीपूरला जाणाऱ्या बसमध्ये उजाला नावाची एक मुलगी देखील होती, जिने सोनमला पाहिलं होतं.
10 / 10
गाझीपूरला पोहोचल्यानंतर सोनमने तिच्या भावाला ढसाढसा रडत एका ढाब्यावरून फोन केला. त्यानंतर तिला शोधण्यात यश आलं. सोनमने फेब्रुवारी २०२४ पासून राजाला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली होती.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसmarriageलग्न