शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोण होता 'एल मेंचो'? शेतमजूर, पोलीस ते जगातील सर्वात खतरनाक ड्रग माफिया; वाचा एका क्रूर गुन्हेगाराचा थरारक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 10:18 IST

1 / 8
जगातील अमली पदार्थांच्या तस्करीतील सर्वात कुख्यात नाव म्हणजे 'एल मेंचो'. मेक्सिकोच्या मिचोआकन भागात जन्मलेल्या या व्यक्तीने गुन्हेगारी विश्वात अशा काही क्रूर घटना घडवल्या की, त्याचे नाव ऐकताच प्रशासनाचा थरकाप उडत असे. एका सामान्य शेतमजुरापासून ते 'मोस्ट वॉन्टेड' ड्रग लॉर्डपर्यंतचा त्याचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे.
2 / 8
१९६६ मध्ये जन्मलेल्या एल मेंचोचे बालपण अफीम आणि गांजाच्या शेतात मजुरी करण्यात गेले. अधिक पैशांच्या हव्यासापोटी तो अमेरिकेत गेला, परंतु तिथे हेरॉईन तस्करीच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवास भोगावा लागला.
3 / 8
तुरुंगातून सुटल्यावर आणि अमेरिकेतून हद्दपार झाल्यावर तो मेक्सिकोला परतला आणि आश्चर्य म्हणजे तो तिथे पोलीस दलात भरती झाला. मात्र, गुन्हेगारीची ओढ त्याला पुन्हा त्या काळोख्या विश्वात घेऊन गेली.
4 / 8
सुरुवातीला 'सिनालोआ कार्टेल'साठी काम करणाऱ्या एल मेंचोने हळूहळू स्वतःची ताकद वाढवली आणि 'जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल' उभे केले. अल्पावधीतच त्याने आपल्या जुन्या मालकांविरुद्ध (सिनालोआ) युद्ध पुकारले आणि मेक्सिकोचा सर्वात प्रभावशाली माफिया म्हणून उदयास आला.
5 / 8
एल मेंचोची ओळख केवळ तस्करीपुरती मर्यादित नव्हती, तर तो त्याच्या अमानुष क्रूरतेसाठी ओळखला जात असे. २०१५ मध्ये त्याने पकडण्यासाठी आलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने उडवून दिले होते. त्याच्या टोळीने विरोधकांचे आणि पोलिसांचे शिरकाण करण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दहशत निर्माण केली होती.
6 / 8
त्याच वर्षी त्याने प्रशासनाला आव्हान देण्यासाठी अवघ्या सहा आठवड्यांत २४ पोलीस कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या केली. 'अल चापो'च्या अटकेनंतर एल मेंचो हा मेक्सिको सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान ठरला होता.
7 / 8
मेक्सिकोचे सुरक्षा प्रमुख उमर गार्सिया हार्फुक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. हार्फुक स्वतः एकदा एल मेंचोच्या कार्टेलने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले होते. अमेरिकेत 'फेंटानिल' सारख्या जीवघेण्या अमली पदार्थांच्या तस्करीमागे एल मेंचोचा सर्वात मोठा हात होता.
8 / 8
अमेरिकेने त्याच्यावर १५ दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे १२४ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले होते.
टॅग्स :Mexicoमेक्सिकोAmericaअमेरिकाDrugsअमली पदार्थ