शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mansukh Hiren Case : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने मागितली एक महिन्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 9:11 PM

1 / 6
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे, रियाझुउद्दीन सिद्दीकी आणि सुनील माने यांनी तपास यंत्रणा तपास सुरू झाल्यानंतर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करू न शकल्याने आपल्याला आपोआप जामीन मिळावा, यासाठी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मगण्याकरिता न्यायालयात अर्ज केला.
2 / 6
९ जून रोजी विशेष न्यायाधीश प्रशांत सिंत्रे यांनी एनआयएला दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती.
3 / 6
दरम्यान, एनआयएने न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या मुदतीत तपास यंत्रणेने पुढे तपास करत पाच जणांना ताब्यात घेतले.
4 / 6
त्यांच्याकडून मिळालेल्या कागपत्रांचे विश्लेषण करून अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेली मुदतवाढ पुरेशी नाही. त्यामुळे आणखी ३० दिवस वाढवून द्यावेत.
5 / 6
अंटालिया स्फोटके प्रकरणी तोंड बंद ठेवण्यासाठी मनसुख हिरेन याची हत्या करण्याकरिता आरोपींना ४५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावाही एनआयएने केला आहे.
6 / 6
सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन हिरेन यांची हत्या घडवून आणली गेली, असा खळबळजनक खुलासा एनआयएनं केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी ४५ लाखांची सुपारी देण्यात आल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.
टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणCourtन्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाsachin Vazeसचिन वाझे