चार मुलांच्या आईला भेटायला रात्री आला प्रियकर, सासरच्यांनी बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 22:09 IST
1 / 6महिलेच्या सासरच्यांनी प्रियकरासोबत बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले. यानंतर त्याने प्रियकराला रस्त्यावर ओढले आणि इतके मारहाण केली की, आता त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.2 / 6खरं तर, गोपालगंज गावात रात्रीच्या अंधारात एक प्रियकर विवाहित मैत्रिणीला भेटायला सासरच्या घरी पोहोचला. 3 / 6महिलेच्या सासरच्यांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी प्रियकराला बेडरूममध्ये पकडले.4 / 6यानंतर सासरच्यांनी तरूणाला आपल्या घराबाहेर खेचले आणि नग्न केले. हा आवाज ऐकून आजूबाजूला लोक जमा झाले आणि जमावाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.5 / 6सासरच्या सदस्यांनी त्या युवकाच्या पायाला दोरी बांधून त्याला अनेक किलोमीटरपर्यंत खेचत नेले. काही ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सांगण्यावरून जमावाने आरोपी प्रियकराला सोडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्या युवकाचा जीव वाचवला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 6 / 6वृत्तानुसार, गावकऱ्यांनी सांगितले की, तरूण भेटायला आलेली विवाहित महिला चार मुलांची आई आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिका्यांनी या घटनेसंदर्भात कोणतेही विधान करण्यास नकार दिला.