अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:11 IST2025-07-15T14:04:38+5:302025-07-15T14:11:15+5:30

जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा, ज्याचा प्रयत्न धर्मांतरणाच्या माध्यातून उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यातील भूगोल बदलण्याचा होता. हिंदू धर्माविरोधात द्वेष पसरवून इस्लामिक देशाच्या दिशेने पाया रचण्याचं काम तो करत होता. त्याच्या या कृत्यासाठी छांगूर बाबाने अशा कुटुंबाला निवडले जे गरीब आहेत, मजुरीवर उदरनिर्वाह करतात. पैशामुळे ज्यांचे जगणे कठीण होते.
छांगूरबाबाने कुणाला त्यांच्या अंगठीच्या जाळ्यात फसवले, कुणाला पैशाचे लालच दिले तर कुणाला घाबरवून, धमकावून धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. छांगूर बाबा पोलिसांच्या तावडीत सापडला तसं त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले.
एटीएस छांगूर बाबाची चौकशी करत आहे, त्यात धर्म परिवर्तनासाठी त्याने टोळी तयार करण्यासाठी दुबईहून मौलानाची टीम बोलावली होती ते समोर आले. या मौलानाच्या माध्यमातून तो त्याच्या टोळीला पैशाचा धाक आणि वर्चस्व दाखवायचा. त्यातून धर्म परिवर्तन करण्याचे मिशन त्याने हाती घेतले.
इतकेच नाही तर छांगूर बाबाने त्याचे हेतू साध्य करण्यासाठी त्याच्या कोठीच्या बेसमेंटमध्ये खास प्रकारची खोली बनवली होती. या खोलीत दुबईहून आणलेल्या मौलानाकडून त्याच्या सहकाऱ्यांना ट्रेनिंग दिले जायचे. त्यानंतर हे लोक निवडक गरीब कुटुंबाना हेरून त्यांचे धर्म परिवर्तन करत होते. गरीब घरातील महिला त्यांचा टार्गेट होती.
छांगूर बाबाने त्याच्याकडे जवळपास ५० जणांची टोळी बनवली होती. जे थेट त्याच्या आदेशावर काम करायचे. त्यांच्या राहणे-खाणेपासून सर्व सुविधा कोठीत उपलब्ध करून दिली होती. धर्म परिवर्तनासाठी छांगूर बाबाला इस्लामिक देशांकडून फंडिंग मिळायचे असे पुरावेही एटीएसच्या हाती लागले आहेत
छांगूर बाबाचा अगदी विश्वासू मानला जाणाऱ्या नवीन नावाच्या व्यक्तीचे स्वीस बँकेत खाते असल्याचे तपासात उघड झाले. सध्या एटीएस या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करत आहेत. छांगूर बाबाला धर्मांतरणासाठी विविध मुस्लीम देशांतून देणगी मिळत होती.
छांगूर बाबाचा मागील इतिहासही तितकाच रंजक आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा लहानपणापासूनच गल्लीबोळात फिरून ताविज आणि अंगठ्या विकण्याचं काम करत होता.
त्याने त्याच्या पत्नीला गावच्या निवडणुकीतही उभे केले होते. पाहता पाहता छांगूर बाबाचे दिवस बदलत गेले. सध्या छांगूर बाबाच्या चौकशीत एटीएसला त्याच्या नावावर १०० कोटीहून अधिक मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
छांगूर बाबाने लव्ह जिहादसाठी 'शिजर-ए-तैयबा' नावाने एक पुस्तकही प्रकाशित केले होते. आता एटीएस या पुस्तकात लिहिलेल्या शब्दांची चौकशी करत आहे. छांगूर बाबा या पुस्तकाद्वारे लोकांना लव्ह जिहादसाठी भडकावत असे.
बलरामपूरमधून अटक करण्यात आलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूरचे चार जवळचे सहकारी पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर धर्मांतराचा खेळ खेळत होते. या चौघांविरुद्ध २५ मे २०२३ रोजी आझमगडच्या देवगाव पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.