मी गँगस्टरची बहीण असं म्हणत दारूच्या नशेत महिलेने केला गोळीबार, व्हिडीओ व्हायरल 

By पूनम अपराज | Published: November 24, 2020 08:26 PM2020-11-24T20:26:20+5:302020-11-24T20:47:55+5:30

Firing : दिल्लीच्या जाफराबाद भागात एका बुरखा घातलेल्या महिलेने दणादण गोळ्या झाडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत ही महिला गँगस्टर नासिरची बहीण असल्याचा दावा करत दुकानाच्या शटरवर गोळ्या झाडत आहे. त्यानंतर ती दुसर्‍या पुरुषासह दुचाकीवर निघाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिला नुसरत (वय 30) याला अटक केली. (All photo - Amar Ujala)

तिच्याकडील एक पिस्तूलही पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी महिलेची चौकशी करून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 नोव्हेंबर रोजी चौहान बांगर गली नंबर -4 मध्ये घडली. व्हिडिओमध्ये एका दुचाकीवरील बुरख्यामध्ये एक महिला तेथे येत असल्याचे दिसत आहे. महिलेने गांजा सेवन केले असून मद्यप्राशन केले होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये ती दुचाकीवरून उतरताच ती पिस्तूल काढून बंद दुकानाच्या बाहेर उभी राहून प्रथम शिवीगाळ करते. त्यानंतर तिने पिस्तूलमधून चार-पाच गोळ्या झाडल्या. जेव्हा दुचाकीस्वाराने तिला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती पुन्हा शूट करते. यादरम्यान, ती स्वत: ला गँगस्टर नासिरची बहीण असल्याचे सांगते. नंतर ती दुचाकीवर बसते. कुणीतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

रविवारी पोलिसांनी महिलेला पिस्तुलासह अटक केली. तपासादरम्यान महिला नुसरत म्हणाली की, तिचा नवरा हा देखील त्या परिसरातील गुंड आहे.  आरोपी महिलेने सांगितले, दुकानदार मित्राचा मोबाइल व्यवस्थित करून देत नाही.

यावेळी त्यांनी 36 हजार रुपये किंमतीची पिस्तूल खरेदी करून गुन्हा केला. पोलीस आरोपी महिलेची चौकशी करत आहेत आणि ती पिस्तूल कोठून मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.