By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 16:28 IST
1 / 6गेल्या काही काळापासून पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशयाचे प्रमाण वाढल्याचे विविध घटनांमधून दिसून येत आहे. दरम्यान. पत्नीच्या चारित्र्याबाबत असलेल्या संशयामधून तिच्यासोबत केलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.2 / 6उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यामधील राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय होता. त्यावरून या नवरा-बायकोमध्ये सातत्याने भांडणं होत असत. शनिवारीसुद्धा या दोघांमध्ये मोठे भांडण झाले. त्यानंतर पती संतप्त झाला. त्याने पत्नीला मारहाण केली. महिलेने खूप आरडा-ओरडा केला. या दरम्यान पतीने पत्नीचे गुप्तांग तांब्याच्या तारेने शिवून टाकले. 3 / 6या क्रूर कृत्यामुळे जखमी झालेल्या महिलेची प्रकृती बिघडली. त्यानंतर या प्रकरणी मिलक येथील पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. 4 / 6या प्रकाराबाबत पीडितेने पोलिसांना सांगितले की, माझ्या पतीने माझ्या शरीराला टाके घातले. तो माझ्यावर संशय घेतो. मला पापी समजतो. मी झोपलेली असताना सकाळी सहा वाजता त्याने माझे हात आणि पाय पकडले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर त्याने माझ्या गुप्तांगाला तांब्याच्या तारेने टाके घातले. 5 / 6आरोपी पतीने सांगितले की, माझी पत्नी मला फसवत होती. तसेच ती एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवत होती. मी सकाळी कामावर जातो. त्यानंतर माझी पत्नी फिरायला बाहेर पडत असे. त्यामुळे संतापाच्या भरात मी तिच्या गुप्तांगाला तारेने टाके घातले. मी पत्नीची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी मेहनत मजुरी करतो. मात्र माझी पत्नी माझ्यासोबत चुकीचे वागत आहे. 6 / 6याबाबत पोलीस अधीक्षक शगुन गौतम यांनी सांगितले की, रामपूर जिल्ह्यातील एका महिलेने तिचे पती तिच्यासोबत मारहाण करतात, तसेच अमानवी कृत्य करतात. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला गेला. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणीही केली गेली. या चाचणीत जी जखम दिसून आली. त्यावरून या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येणार आहे.