शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्युटी पार्लरमध्ये सुरू होता नववधूचा शृंगार, लग्नाच्याच दिवशी असा घडला हत्येचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 18:25 IST

1 / 7
नववधू मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये गेली होती. या दरम्यान प्रेमसंबंधातून प्रियकराने ब्यूटी पार्लरमध्ये घुसून धारदार शस्त्रानं तिचा गळा चिरला.
2 / 7
प्रेमसंबंधातून शानू हिचा दुसरा विवाह होता. पहिला विवाह उज्जैन येथे झाला असून घटस्फोट झाला होता. प्रियकर राम यादवसोबत तिचे ४ वर्ष प्रेमसंबंध होते. पोलिसांनी आरोपी रामचा साथीदार पवन पांचाळ याला काल अटक केली तर दुसरा आरोपी राम यादव याला आज अटक करण्यात आली. 
3 / 7
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नववधूला तात्काळ जावरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
4 / 7
पूर्व प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शानू यादव (वय-32) असं मृत नववधूचं नाव आहे.
5 / 7
मिळालेली माहिती अशी की, शाजापूर येथील रहिवासी शानू यादव हिचा विवाह नागदा येथील गौरव जैन याच्याशी रविवारी होणार होता. एका हॉटेलात विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. नववधू सोनू ही सकाळीच आपल्या नातेवाईकांसोबत शाजापूर येथून जावरा येथे आली होती. विवाहपूर्वी शानू मेकअप करण्यासाठी जावरा येथील आंटिया चौकातील एका ब्यूटी पार्लरमध्ये गेली होती. याच वेळी अज्ञात मारेकऱ्याने शानूचा गळा चिरुन तिची निर्घृण हत्या केली.
6 / 7
शानूच्या बहिणीनं सांगितलं की, शानूचा मेकअप सुरू असताना तिच्या मोबाइलवर एक कॉल आला. एक तरुण बोलत होता. त्यानं त्याचं नाव राहुल असं सांगितलं. त्याला शानूशी बोलायचं होतं. मात्र, तो बोलत बोलत अचानक ब्यूटी पार्लरमध्ये घुसला आणि काही समजण्याच्या आतच त्यानं सोबत आणलेल्या धारदार शस्त्रानं सोनूचा गळा चिरून फरार झाला.
7 / 7
जावरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपी रामचा शोध सुरु करून त्याला अटक केली आहे. ब्यूटी पार्लर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. एका नववधूची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यामुळे जावरा शहरात खळबळ उडाली आहे.
टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक