शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 20:36 IST

1 / 6
मृतदेहाकडे पाहिले तर असे वाटते की, त्याचा बळी दिला गेला आहे. संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
2 / 6
यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.
3 / 6
वास्तविक ही घटना लोनिकटरा पोलिस स्टेशनच्या शिवनाम गावची आहे. मृत मुला दिव्यांशु दोन दिवसांपूर्वी होळीच्या निमित्ताने आपल्या आजोबांकडे आला होता. 
4 / 6
मृतदेहाकडे पाहता प्राथमिक तपासात  असे दिसते की, अल्पवयीन मुलाला आधी ठार मारण्यात आले आणि नंतर घनदाट जंगलात झाडाच्या जटांना बांधले गेले. त्याचवेळी, घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर, कालव्याजवळील लिंबू आणि रक्तही आढळून आले आहे.
5 / 6
पोलिस पथक घटनेचा तपास करत आहे. दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांचा असा आरोप आहे की, नरबळीसाठी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एएसपी मनोज पांडे घटनास्थळी पोहोचले.
6 / 6
पांडे म्हणतात की, कोठी येथील रहिवासी दिव्यांशु काही दिवसांपासून आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता, मंगळवारी संध्याकाळी तो बेपत्ता झाला होता. बुधवारी पहाटे जंगलातील संशयास्पद अवस्थेत त्याचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला. घटनेचा तपास सुरू आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू