सावधान! तुमच्याही मोबाईलमध्ये आलाय का TikTok Pro चा मेसेज?; लिंक ओपन कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:10 PM2020-07-07T12:10:52+5:302020-07-07T12:14:47+5:30

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. या रक्तरंजित संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्याने चीनविरोधात संतापाची लाट पसरली.

चीनच्या कुरापतींना आर्थिक झटका देण्यासाठी भारताने राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देता टिकटॉकसह ५९ चिनी अँप्सवर बंदी आणली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाने चीनला दणका बसला.

टिकटॉक हे भारतातलं सुप्रसिद्ध अँप होते, भारत सरकारपासून अनेक लाखो युजर्सचं त्यावर अकाऊंट होते, हजारोंच्या संख्येने फॉलोअर्स असल्याने आणि प्रसिद्धी मिळत असल्याने तरुणाईमध्ये टिकटॉक प्रचंड गाजले.

मात्र केंद्र सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर आता काही लोक याचा फायदा उचलत लोकांना गंडवण्याचं काम करत असल्याचं उघड झालं आहे. ज्यांच्याकडे हा अँप आहे तेदेखील चालत नाही.

अशातच काही महाभाग टिकटॉकच्या नव्या व्हर्जनबद्दल व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवत आहेत. त्यात कंपनीने टिकटॉक प्रो नावाचं नवीन APP लॉन्च केल्याचं सांगण्यात आले आहे.

या मेसेजखाली एक लिंकवर क्लिक करुन तुम्ही Tiktok Pro डाऊनलोड करु शकता असं सांगितलं आहे, मात्र तुम्हाला खबरदारीचा इशारा की या लिंकवर क्लिक करु नका.

तुमच्याकडे अशाप्रकारे कोणताही मेसेज येत असेल आणि तुम्ही टिकटॉक प्रो डाऊनलोड करण्यासाठी त्या लिंकवर क्लिक कराल तर तुम्ही सायबर गुन्ह्याचे शिकारी होऊ शकता. तुमचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता आहे.

या फेक मेसेजमध्ये टिकटॉकचं आयकॉन पूर्वीप्रमाणे अगदी खरं वाटेल असचं आहे. सुरुवातीला टिकटॉकप्रमाणे ते कॅमेरा, गॅलरी, माइक, कॉल लॉगचं परवानगी मागेल. त्यानंतर तुमची सर्व माहिती घेऊन तुमच्या खात्यातील रक्कम लंपास करण्यात येते.

टिकटॉक हे एप्लिकेशन भारतात प्रचंड प्रसिद्ध होतं. राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडापट्टू, अनेकजणांचे यावर खाते होते, पण भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका टिकटॉकला बसला.

काही ठिकाणी टिकटॉक बंद झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आत्महत्या केल्याचंही दिसून आलं. मनोरंजनासाठी असणाऱ्या या एप्लिकेशननं तरुणाईला अक्षरश: वेडं केले होते. १५ ते ६० सेकंदाच्या व्हिडीओच्या माध्यमातून अनेकजण रातोरात स्टार झाले होते.

Read in English