५००-५०० च्या नोटांचा बेड, बुटांच्या बॉक्समध्ये बंडल; आग्रा येथील छाप्याची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 03:38 PM2024-05-20T15:38:33+5:302024-05-20T15:44:05+5:30

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे चप्पल व्यापाऱ्याच्या ठिकाणांवर आयकर विभागानं धाड टाकली. जवळपास ३ दिवस ही कारवाई सुरू होती. व्यापाऱ्याने बेड, बुटांच्या बॉक्समध्ये रोकड लपवण्यात आली होती. आयटीच्या धाडीत तब्बल ५३ कोटींची रोकड जप्त करण्यात आली.

आयकर विभागाच्या या धाडीत पावत्यांमधून हा व्यवहार होत असल्याचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. आग्रा येथे चप्पल व्यावसायिक पावत्यांमधून इतकं मोठं साम्राज्य कसं उभारलं हे आपण जाणून घेऊया

जगभरात प्रसिद्ध आग्रा येथील चप्पलांचा व्यवसाय जवळपास २० हजार कोटींचा आहे. या व्यवहारात नोटांऐवजी पावत्यांमधून मोठा व्यवहार झाला. त्यात व्यापारी किरकोळ कमिशन कापून पावत्यांमधून कोट्यवधी रुपयांची रोख घेतली जात होती.

घरगुती चप्पल व्यवसाय हा बहुतांश उधारीवर निर्भर आहे. ट्रेडर्स आणि मोठे व्यापारी छोट्या व्यावसायिकांना तातडीने पेमेंट करण्याऐवजी पावती बनवून देतात. त्यावर तारीख आणि कालावधी लिहिलेला असतो. विहित मुदतीत पावती देणारा व्यावसायिक छोट्या व्यावसायिकांकडून पेमेंट घेतात.

हा पूर्ण व्यवहार २ नंबरवर चालतो. त्यात एकीकडे व्यवहारात रोख दिसत नाही तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात टॅक्समध्येही हेराफेरी केली जाते. पावत्यांचा हा व्यवहार १०० हून अधिक मोठ्या चप्पल व्यावसायिकांकडून सुरू आहे. पावती देण्यातून ३ टक्के व्याजही दिले जाते.

सूत्रांनुसार, आयकर विभागानं हरमिलाप ट्रेडर्सच्या मालकाच्या घरी मोठ्या प्रमाणात पावत्या सापडल्या. त्यात २० हून अधिक व्यावसायिकांची नावे होती. गेल्या १ महिन्यापासून निवडणुकीमुळे पावत्यांचे पेमेंट होत नव्हते. रोख रक्कम जप्तीमुळे व्यावसायिक पावत्या घेत होते. निवडणूक संपल्यावर हा व्यवहार होणार होता.

या पावत्यांचे व्यवहार समोर आल्यानं शहरातील इतर व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. या पावत्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची माहिती आहे. ज्या आधारे आयकर विभाग बाकी व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर नजर ठेवू शकते. सूत्रांनुसार, ५० कोटींहून अधिक व्यवहारांच्या पावत्या सापडल्या आहेत. हरमिलाप ट्रेडर्स काही वर्षापासून चप्पल व्यावसायिकांमध्ये प्रसिद्ध नाव आहे.

आयकर विभागाने मुख्यत: हरमिलाप ट्रेडर्स आणि त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या बीके शूज, मंशू फुटवेअर यांच्याही ठिकाणांवर धाडी टाकल्या. हरमिलाप ट्रेडर्सच्या घरात छापेमारी करताना बेडरूमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली.

जप्त केलेल्या रोकडी मोजणी सुरू आहे. व्यापाऱ्याच्या घरी बुटांच्या बॉक्समध्ये, थैल्यांमध्येही रोकड सापडली आहे. इतकेच नाही तर धाडीत जितके पैसे सापडलेत त्यात सर्वाधिक ५००-५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आहेत.