शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 18:06 IST

1 / 6
२५ वर्षाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. या महिलेने १६ वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये बोलावून त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. १६ वर्षाचा मुलासोबत महिलेची इन्स्टाग्रामवर भेट झाली होती. तिथूनच त्यांच्यातील मैत्री वाढत गेली.
2 / 6
छत्तीसगढमधील कबीरधाम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ख्याती विश्वकर्मा असे महिलेचे नाव आहे. मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
3 / 6
ख्याती विश्वकर्मा आणि पीडित मुलगा हे सोशल मीडियावर भेटले होते. तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी ख्याती विश्वकर्मा हिने अल्पवयीन मुलाला भोरमदेव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवले होते. महिलेने मुलाला भावनिक केलं. त्याच्यावर दबाव आणला आणि शरीरसंबंध ठेवले.
4 / 6
महिलेने मुलावर अत्याचार केल्यानंतर याबद्दल कुणालाही सांगू नको, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगा घाबरला आणि त्याने याबद्दल मौन बाळगलं होतं. पण, काही दिवसांनी त्याने धाडस केलं आणि पोलिसांना सगळा प्रकार सांगितला.
5 / 6
जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार, महिलेचा प्रेमविवाह झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले असून, लग्नाच्या आधीपासूनच ती पीडित मुलासोबत बोलत होती. १ एप्रिल रोजी तिने मुलाला भेटायला बोलावलं होतं.
6 / 6
मुलगा महिलेने बोलावलेल्या हॉटेलमध्ये भेटायला गेला. त्यावेळी महिलेने त्याला भावनिक बोलत गुंतवलं. त्यानंतर तिने त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार दिल्यानंतर तिने त्याला दबावाखाली आणत बळजबरी केली.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्रामArrestअटक