बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:58 IST
1 / 7बेलघरिया येथील एका अपार्टमेंटमधून रोख रक्कम जप्त करण्यात आली आणि रात्रभर मोजणी केल्यानंतर जप्त केलेली रोकड 10 लोखंडी पेठाऱ्यांमध्ये पाठवण्यात आली. (All Photos - NBT)2 / 750 कोटींहून अधिक रोकड सापडली : आतापर्यंत एकूण 50 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.3 / 7या ठिकाणांवर छापे टाकले : दक्षिण कोलकातामधील राजडांगा आणि उत्तर कोलकातामधील बेलघरिया येथे विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.4 / 7फ्लॅटचे कुलूप तोडून पथक आत गेले : ईडीच्या अधिकाऱ्यांना बेलघरियाच्या रथतला भागातील दोन्ही फ्लॅटच्या चाव्या न मिळाल्याने दरवाजा तोडून आत जावे लागले.5 / 7 बेडरूमच्या कपाटात रोख रक्कम व सोने होते, अर्पिता मुखर्जी यांच्या बेडरूममधील कपाट रोख रक्कम आणि सोन्याने भरले होते. 50 कोटींहून अधिक रोकड सापडली6 / 7तीन किलो सोन्याच्या सळ्या : अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटी रुपयांचे भारतीय चलन आणि तीन किलो सोन्याच्या सळ्या जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 7 / 7अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून २७ कोटी ९० लाख रोख आणि ४.३१ कोटींचे दागिने जप्त