१ हत्या अन् ६० लोकांनी गुन्हा केला कबूल; तरीही मिळाला नाही खरा आरोपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 03:34 PM2020-05-23T15:34:56+5:302020-05-23T15:38:02+5:30

जगभरात अनेक हत्येची प्रकरणे आहेत, जी अनेक वर्षांपासून एक रहस्य बनून राहिली आहे, कारण आजपर्यंत त्यांचे मारेकरी पोलिसांना सापडलेले नाहीत. अशीच एक बाब अमेरिकेत घडली असून तिला 'ब्लॅक राईट मर्डर केस' म्हणून ओळखले जाते. 

सन १९४७ मध्ये झालेल्या या हत्येने अमेरिकेत दहशत निर्माण केली होती. हा खटला लॉस एंजेलिसमधील सर्वात जुनी केस असून अद्याप छडा न लागलेल्या खून प्रकरणांपैकी एक हा हत्याकांड असल्याचे मानला जातो, कारण हा खून लॉस एंजेलिसमध्ये झाला होता.

खरं तर अमेरिकेच्या बोस्टनमधील रहिवासी असलेल्या एलिझाबेथ शॉर्टला ब्लॅक दाहिला म्हणून ओळखलं जात होतं. १ जानेवारी, १९४७ रोजी ती अचानक गायब झाली, त्यानंतर तिचा मृतदेह पाच दिवसांनंतर १५ जानेवारीला सापडला. तिच्या शरीराच्या कित्येक भागांवर खोल जखमा आणि कंबरेकडून अर्धे शरीर कापलेले होते. मारेक्याने धारदार शस्त्राने कान शिरला होता. 

सामान्यत: हत्या प्रकरणात मारेकरी स्वत: चा गुन्हा कबूल करण्यास नाखूष असतात, परंतु एलिझाबेथ शॉर्टच्या हत्येचे प्रकरण सर्वांपेक्षा वेगळे होते, कारण सुरुवातीच्या तपासणीत सुमारे ६० जणांनी एलिझाबेथ शॉर्टच्या हत्येची कबुली दिली होती, ज्यात पुष्कळ पुरुष होते. तथापि, हा हत्येचा गुन्हा कधीच सिद्ध झाला नाही, म्हणून त्यांना सोडून देण्यात आले.

एलिझाबेथ शॉर्टच्या हत्येची कबुली आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांनी दिली, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे गुन्हा कबूल केलेल्यांपैकी बर्याचजणांचा शॉर्टची हत्या झाली तेव्हा जन्मही झालेला नाही. त्यावेळी लोकांची दिशाभूल करण्याचा गुन्हा देखील दाखल झाला.

या हत्याकांडावर बरीच पुस्तकेही लिहिली गेली आहेत. एलिझाबेथ शॉर्टचा खून हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात क्रूर आणि सिद्ध न झालेल्या गुन्ह्यांपैकी एक मानला जात आहे, कारण हत्येखोराचा अद्याप शोध लागलेला नाही. अगदी टाइम मासिकाने हे जगातील सर्वात कुख्यात, आरोपींचा शोध न लागलेले प्रकरण म्हणून सूचीबद्ध केले आहे