शिकवीन चांगलाच धडा....! गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनलला सामंथाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:23 PM2021-10-21T17:23:00+5:302021-10-21T17:29:21+5:30

अनेक युट्यूब चॅनल्सनी सामंथाचे विवाहबाह्य संबंध असून तिने गर्भपात केल्याच्या बातम्या दिल्या होत्या. या बातम्यांनी सामंथा चांगलीच बिथरली आहे.

अभिनेता नागा चैतन्य बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूनं अखेर खोट्या बातम्या पसरवणा-यांना चांगलाच दणका दिला. खोट्या बातम्या पसरवणाºया युट्यूब चॅनल्सविरोधात कारवाई करण्याचा निर्णय सामंथाने घेतला आहे.

अनेक युट्यूब चॅनल्सनी सामंथाचे विवाहबाह्य संबंध असून तिने गर्भपात केल्याच्या बातम्या दिल्या होत्या. या बातम्यांनी सामंथा चांगलीच बिथरली आहे.

काही युट्यूब चॅनल्सना तिने नोटीस पाठवली आहे. तिच्या पीआरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सामंथा सध्या तिची जवळची मैत्रीण शिल्पा रेड्डी सोबत ऋषीकेश येथे आहे.

सुमन टीव्हीला सुद्धा सामंथाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याशिवाय तिच्यावर गर्भपाताचा आरोप करणारे वकील वेंकट राव यांना सुद्धा तिने नोटीस पाठवली आहे.

घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांनी आपआपले तर्कवितर्क लढवले होते. सामांथाच्या प्रेमप्रकरणामुळे तिच्यात आणि नागा चैतन्यात दुरावा निर्माण होवून घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

काही चॅनल्सने तर सामंथाचं तिच्या डिझायनरसोबत अफेअर असल्याचं म्हटलं होतं.