‘भाभीजी घर पर है’ची अंगूरी भाभी गोव्यात करतेय धमाल, याआधी कधीही पाहिले नसतील असे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:19 PM2021-10-20T17:19:39+5:302021-10-20T17:25:36+5:30

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून अंगूरी भाभी बनून प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या गोव्यात आहे.

भाभीजी घर पर है या मालिकेतून अंगूरी भाभी बनून प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या गोव्यात आहे.

गोव्यात आपल्या गर्ल गँगसोबत ती नुसती धम्माल करतेय. या व्हॅकेशनचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

भाभीजी घर पर है मालिकेत निरागस आणि भोळ्या भाबड्या पत्नीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे ख-या आयुष्यात चांगलीच बोल्ड आहे.

तिच्या गोव्या व्हॅकेशनचे फोटो पाहिल्यानंतर शुभांगी किती बोल्ड आहे, हे तुम्हालाही कळेल. भाभीचा असा बोल्ड लूक कदाचित तुम्ही पाहिला नसेल.

एका फोटोत एक जाळीदार टॉप परिधान करून शुभांगी गार्डनमध्ये बसलेली दिसतेय. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

2016 साली शुभांगीने भाभीजी घर पर है या मालिकेत शिल्पा शिंदेला रिप्लेस केले होते. शिल्पा शिंदेने शो सोडल्यानंतर अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी सुमारे 80 अभिनेत्रींनी आॅडिशन दिलं होतं.

एकता कपूरने 2006 साली ‘कसौटी जिंदगी की’मधून शुभांगीला लॉन्च केलं होतं. यानंतर कस्तूरी, दो हंसों का जोडा आणि चिड़िया घर या मालिकेतही ती दिसली.

Read in English