Stoke Park: ही आहे मुकेश अंबानींची दुसरी अँटिलिया, राजवाड्याप्रमाणे असलेल्या वास्तूची अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:16 PM2021-11-05T12:16:21+5:302021-11-05T12:23:17+5:30

Stoke Park : रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा असलेल्या Mukesh Ambani यांचे मुंबईतील निवासस्थान असलेली Antilia नेहमीच चर्चेत असते. दरम्यान मुकेश अंबानी आता काही काळ लंडनमध्ये वास्तव्य करणार असून, त्यासाठी त्यांनी तिथे अँटिलियासारखाच भव्य राजवाडा खरेदी केला आहे.

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान असलेली अँटिलिया नेहमीच चर्चेत असते. दरम्यान मुकेश अंबानी आता काही काळ लंडनमध्ये वास्तव्य करणार असून, त्यासाठी त्यांनी तिथे अँटिलियासारखाच भव्य राजवाडा खरेदी केला आहे.

मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी हा राजवाड्यासारखा बंगला खरेदी केला आहे. तब्बल ३०० एकरमध्ये पसरलेल्या स्टोक पार्क या वास्तूची किंमत तब्बल ५९२ कोटी रुपये एवढी आहे.

भव्य राजवाड्याप्रमाणे दिसणाऱ्या या स्टोक पार्कमध्ये तब्बल ४९ बेडरूम आहेत. वर्षातील काही काळ अंबानी कुटुंबीयांचं वास्तव्य या स्टोक पार्कमध्ये असणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबीयांना आवश्यक अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

मुकेश अंबानी आणि कुटुंबीय यावेळी दिवाळीसाठी परदेशात गेले आहेत. ते दिवाळीनंतर भारतात परतण्याची शक्यता आहे. अंबानी कुटुंब सेकंड होमच्या शोधात होते. अँटिलियाप्रमाणे प्रशस्त आणि स्वतंत्र इमारत, असावी अशी अंबानी कुटुंबाची अपेक्षा होती. दरम्यान, स्टोक पार्क पसंत पडल्यावर त्याचा व्यवहार झाला आणि अंबानींच्या सोईप्रमाणे काम सुरू झाले.

स्टोक पार्कमध्ये अंबानी मंदिरही उभारणार असून, त्यासाठी गणपती, हनुमान, राधाकृष्णाची मूर्ती खास राजस्थानहून मागवण्यात आली आहे. तसेच या मंदिरातील नित्यपूजेसाठी भारतातून दोन पुजारीही लंडनला नेण्यात येणार आहे.

स्टोक पार्क हा परिसर तब्बल ३०० एकरमध्ये पसरलेला आहे. १९०८ पर्यंत ही मालमत्ता खासगी ताब्यात होती. त्यानंतर कंट्री क्लबमध्ये तिचे रूपांतर झाले. या राजेशाही स्टोक पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल आणि गोल्फ कोर्स आहे. येथे एक लहानचे रुग्णालयही आहे. अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे स्टोक पार्कमध्ये जेम्स बॉण्डच्या दोन चित्रपटांचेही चित्रिकरण झाले आहे.

Read in English