शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Part Time Jobs Options : पार्ट टाईम जॉबमधून मिळवायची मोठी सॅलरी? तर हे आहेत खास ऑप्शन्स, नक्की जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 1:36 PM

1 / 7
जर आपली पार्ट टाईम जॉब करायची आणि चांगला पैसा कमवायची इच्छा असेल, तर येथे दिलेले जॉब ऑप्शन्स आपली मदत करू शकतात. कॉपी एडिटरपासून ते सॉफ्टवेअर डेव्हलपरपर्यंत असे अनेक ऑप्शन्स आहेत, जे आपण पार्ट टाईम करू शकता.
2 / 7
कॉपी एडिटर अथवा रायटर - कॉपी एडिटर अथवा रायटरला प्रूफरीडिंग आणि लिखान काम करावे लागते. जर आपली भाषेवर चांगली पकड असेल तर आपण या फील्डमध्येही चांगला पैसा कमावू शकतात. यात शब्द आणि पाणांच्या हिशेबाने पैसे मिळतात.
3 / 7
फ्रीलान्स प्रोडक्ट फोटोग्राफर - जर आपल्याला फोटो काढण्याचा छंद असेल तर, पार्ट टाईम माध्यमाने आपण यातूनही चांगले पैसे कमावू शकतात. फोटोग्राफी बरोबरच आपल्याला ग्राफिक डिझाइन आणि फोटोशॉपदेखील येत असेल, तर चांगले पैसे मिळू शकतात.
4 / 7
सॉफ्टवेअर डेव्हलपर - या फील्डमध्ये वेबसाईट डेव्हलप करण्यासंदर्भात, अपडेट करण्यासंदर्भात, नवे अॅप तयार करण्यासंदर्भातील कामे सहजपणे मिळू शकतात. या पार्ट टाईम जॉबमधून आपण तासाला 1000-1500 रुपये कमावू शकता.
5 / 7
ऑनलाईन कम्युनिकेशन असोसिएट - या फिल्डमध्ये वेब कंटेंट अपडेट करण्यापासून ते सोशल मीडिया बघेपर्यंत काम करावे लागते. कंटेंटसंदर्भात चांगला रिपोर्टदेखील तयार करावा लागू शकतो. इस फील्डमध्ये आपल्याला तासाला 500 ते 1000 रुपये मिळू शकतात.
6 / 7
साईन लँग्वेज इंटरप्रेटर - साईन लँग्वेज, हेही पार्ट टाईम आणि फ्रीलान्स जॉबसाठीचे एक चांगले ऑप्शन आहे. या माध्यमाने आपण एखाद्याची मदतच नाही, तर चांगली कमाईसुद्धा करू शकता.
7 / 7
बायलिंग्वल लिगल असिस्टन्ट - जर आपल्याला एकाहून अधिक भाषा येत असतील आणि कायद्याची जाण असेल, तर आपण बायलिंग्वल लिगल असिस्टन्ट म्हणून एखादा प्रोजेक्ट मिळवून काम करायला सुरुवात करा. यातूनही फार चांगल्या प्रकारे कमाई होऊ शकते.
टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीMONEYपैसा