शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगात नोकरी करण्याची संधी, पदवीधरांना मिळणार चांगला पगार; जाणून घ्या कुठे भरायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:27 IST

1 / 10
पदवीधर उमेदवारांना ज्यांना संगणकाचे चांगले ज्ञान आहेत त्यांच्यासाठी एक खास नोकरी उपलब्ध झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाला योग्य युवा उमेदवारांची गरज आहे. ज्यात या उमेदवारांना निवडीनंतर डेटा एन्ट्रीचे काम करायला लागेल.
2 / 10
आयोगाने अलीकडेच त्यांच्या ऑफिससाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी कंपनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने या नवीन भरतीचे नोटिफिकेशन त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केले आहे. www.becil.com याची अधिक माहिती मिळेल. उमेदवारी अर्ज ऑफलाईन घेतले जात आहेत.
3 / 10
या कामासाठी अशा युवकांची आवश्यकता आहे ज्यांना संगणकाशी निगडित कामांमध्ये रस आहे आणि प्रतिष्ठित जागेवर काम करण्याची इच्छा आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी या भरती अर्ज तुम्हाला पाठवता येऊ शकतो. विशेष म्हणजे या माध्यमातून तुम्हाला निवडणूक आयोगासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
4 / 10
निवडणूक आयोग भरतीसाठी काय पात्रता आहे? - या भरतीसाठी उमेदवार कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याला संगणकाची चांगली माहिती हवी. MS EXcel यावर काम करण्याचा अनुभव हवा. इंग्रजीत कमीत कमी ३५ शब्द प्रतिमिनिट टायपिंग यायला हवी. त्याशिवाय उमेदवाराचे वय ३५ पेक्षा अधिक नको
5 / 10
ECI डेटा एन्ट्री ऑपरेटर भरतीची आवश्यक माहिती - ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडकडून निवडणूक आयोगासाठी ही भरती केली जात आहे. १० जागांसाठी ही भरती आहे. यात अर्ज भरण्याची शेवटची मुदत ५ मार्च २०२६ आहे.
6 / 10
ही भरती कंत्राटी पद्धतीची असेल. त्यासाठी तुम्हाला दर महिना २४३५६ रूपये पगार दिला जाईल. ECI DEO Recruitment 2026 Notification यावर अधिक माहिती पाहू शकतो.
7 / 10
डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. त्यासाठी नोटिफिकेशनमधून उमेदवारी अर्जाची प्रिंट घ्या. हा अर्ज सविस्तर भरून घ्या. त्यात नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार नंबर, शिक्षण प्रमाणपत्र, अनुभव यासह विविध माहिती विचारण्यात आली आहे.
8 / 10
अर्जासोबत तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्मदाखला, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडून द्या. अर्ज शुल्क भरताना डिमांड ड्राफ्ट, तारीख आणि शुल्क तपशीलांची प्रत देखील सोबत जोडा.
9 / 10
उमेदवारी अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे एका लिफाफ्यामध्ये टाकून ते ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) ला 'BECIL भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307 UP' या पत्त्यावर पाठवा.
10 / 10
या भरतीत एससी/एसटी/अपंग अर्जदारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना डिमांड ड्राफ्टद्वारे २९५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
टॅग्स :jobनोकरीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग