शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi चा मेक इन इंडियाला बूस्ट; भारतात तयार होतायत १०० टक्के स्मार्ट टीव्ही, ९९ टक्के स्मार्टफोन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 10:48 IST

1 / 20
दिग्गज स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी भारतात दोन नवे मोबाईल उत्पादन प्रकल्प आणि एक स्मार्ट टीव्ही उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे.
2 / 20
शाओमी इंडियाचे प्रमुख आणि जागतिक उपाध्यक्ष मनू जैन यांनी मिंटला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान याबाबत माहिती दिली.
3 / 20
शाओमीचे स्मार्ट टीव्ही हे १०० टक्के मेड इन इंडिया आहेत. तर या व्यतिरिक्त ९९ टक्के शाओमीचे स्मार्टफोन्स भारतात असेंबल करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
4 / 20
'गेल्या वर्षी कोरोनाच्या महासाथीमुळे सप्लाय चेनमध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु शाओमीनं स्मार्टफोन्स कंपोनंट्सच्या उत्पादनात तेजी आणली आहे. यामध्ये ७५ टक्के कंपोनंट्स यामध्ये PCBA, सब बोर्ड, कॅमेरा मॉड्युल, बॅक पॅनल, बॅटरी यांसारख्या पार्टचं स्थानिक पातळीवर उत्पादन केलं जात आहे,' असं मनू जैन यांनी सांगितलं.
5 / 20
कोणत्या अन्य कंपनीनं स्थानिक पातळीवर उत्पादन वाढीसाठी चालना दिली नाही. परंतु शाओमी इंडियामध्ये यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये कोणताही दुसरा ब्रँड आपल्यापेक्षा पुढे नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
6 / 20
Xiaomi गेल्या पाच वर्षांपासून फॉक्सकॉन आणि फ्लेक्स या कंपन्यांसोबत स्मार्टफोन्स तयार करत आहे. यासाठी कंपनीनं त्यांच्यासोबत करारही केला होता.
7 / 20
गेल्या नऊ महिन्यांदरम्यान कंपनीनं दोन नव्या उत्पादन करणाऱ्या भागीदारांना सोबत घेतलं आहे. यामध्ये DBG आणि BYD यांचा समावेश आहे.
8 / 20
यानुसार हरियाणामध्ये पहिला उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. यामुळे उत्पादनाची मासिक क्षमता २० टक्क्यांवी वाढली आहे.
9 / 20
तामिळनाडूमध्ये BYD प्रकल्पाच्याही उत्पादन क्षमतेत मोठं योगदान असण्याची अपेक्षा आहे. या वर्षी हा प्रकल्प सुरू होणार आहे.
10 / 20
Xiaomi नं गेल्या दोन वर्षात Dixon टेक्नॉलॉजीसोबत हातमिळवणी करून स्मार्ट टीव्हीचं उत्पादन करण्यास सुरूवात केली आहे.
11 / 20
कंपनीनं आता रेडिअंट टेक्नॉलॉजीसोबतही हातमिळवणी केली आहे. यामुळे तेलंगणमधील स्थापन करण्यात आलेल्या नव्या उत्पादन प्रकल्पात टीव्हीच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ झाली आहे.
12 / 20
कंपनीन काही प्रोडक्ट्स शेजारी देशांमध्येही निर्यात करण्यास सुरूवात केली आहे. सध्या देशातील गरजा पूर्ण करण्यावर कंपनीनं लक्ष केंद्रीत केलं आहे. या करारांनुसार ते पूर्ण करण्याचे ध्येयही कंपनीनं ठेवलं आहे.
13 / 20
भारताकडे आम्ही एक्सपोर्ट हब म्हणून पाहू इच्छितो, असं मनू जैन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.
14 / 20
गेल्या वर्षी कंपनीनं बांगलादेश, नेपाळ अशा आसपासच्या देशांमध्ये काही प्रमाणात आयात करण्यात सुरूवात केली होती.परंतु व्यापाराठी आमचं प्राधान्य भारतालाच असेल, असंही त्यांनी नमूद केलं.
15 / 20
सध्या वर्क फ्रॉम होम आणि घरून सुरू असलेल्या शिक्षणामुळे स्मार्टफोनच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे आम्हाला उत्पादन वाढवणं आवश्यक असल्याचंही जैन म्हणाले.
16 / 20
आम्ही क्षमतेचा विस्तार करून हे ध्येय गाठू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
17 / 20
फोनमध्ये वापरले जाणारे सर्वाधिक पार्ट्सचं स्थानिक स्तरावर उत्पादन करण्यात आलं आहे किंवा असेंबल अथवा खरेदी करण्यात आल्याचं जैन यांनी सांगितलं.
18 / 20
सध्या शाओमीकडे भारतात पाच कँपस आहेत.
19 / 20
या पाच कँपसमध्ये त्यांचे पार्टनर्स फॉक्सकॉन आणि फ्लेक्स तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात फोन असेंबल करण्याचं काम करतात.
20 / 20
शाओमी यापूर्वीपासूनच भारतात स्मार्टफोनच्या उत्पादनाचं काम करतअसून आता उत्पादन वाढवण्यावर कंपनी काम करत आहे.
टॅग्स :businessव्यवसायxiaomiशाओमीMake In Indiaमेक इन इंडियाSmartphoneस्मार्टफोनTelevisionटेलिव्हिजन