शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? काय करतो कळेल तर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 11:50 IST

1 / 6
Richest Person of Iran: इराणला सध्या अमेरिका आणि इस्त्राइलच्या मोठ्या हल्ल्याचा सामना करावा लागतो आहे. इराण एकटा दोन्ही बलाढ्य देशांसोबत दोन हात करतोय. इराणने एकट्याने दोन्ही मोठ्या देशांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशात इराणच्या तेलासोबत वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा चांगली रंगली आहे. इराण म्हटलं की, सामान्यपणे डोळ्यासमोर येथील तेलाच्या विहिरी आणि खनिज संपत्ती येते. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, या देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कुणी तेल कंपनीचा मालक नाहीये. इराणमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एक टेक दिग्गज आहे. चला जाणून घेऊया तो कोण आहे आणि त्याची संपत्ती किती आहे.
2 / 6
तसं पाहिलं तर इराणी ओळख ही कच्चं तेल आणि गॅस भांडारासंबंधी आहे. तर पिअरेने आपली संपत्ती डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमावली. २०२६ च्या आकडेवारीनुसार, पिअरे ओमिडयारची एकूण संपत्ती जवळपास ११.८ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार जवळपास ₹९,७९४ कोटी सांगण्यात येते. त्याची कमाईचं मुख्य माध्यम टेक्नॉलॉजी स्टॉक्स आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. त्याने ई-बे शिवाय इतरही क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
3 / 6
तसं पाहिलं तर इराणी ओळख ही कच्चं तेल आणि गॅस भांडारासंबंधी आहे. तर पिअरेने आपली संपत्ती डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमावली. २०२६ च्या आकडेवारीनुसार, पिअरे ओमिडयारची एकूण संपत्ती जवळपास ११.८ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार जवळपास ₹९,७९४ कोटी सांगण्यात येते. त्याची कमाईचं मुख्य माध्यम टेक्नॉलॉजी स्टॉक्स आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. त्याने ई-बे शिवाय इतरही क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
4 / 6
आपण जर पिअरे ओमिडयारची तुलना भारतातील सगळ्यात श्रीमंतांसोबत केली तर यात मोठा फरक दिसून येतो. २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती जवळपास ९३.२ बिलियन डॉलर म्हणजेच साधारण ₹७,७३,५६० कोटी इतकी आहे. ते जगातील विसावे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तेच गौतम अदानी यांची संपत्ती ५७.८ बिलियन डॉलर म्हणजे म्हणजेच साधारण ₹४,७९,७४० कोटी इतकी आहे. तुलना केली तर मुकेश अंबानी हे पिअरे ओमिडयारपेक्षा जवळपास ९ ते १० पट जास्त श्रीमंत आहेत.
5 / 6
पिअरे ओमिडयार केवळ ई-बे पर्यंत मर्यादित नाही. त्याने जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्याने फर्स्ट लूक मीडियाची स्थापना केली, जो 'द इंटरसेप्ट' सारखा प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्मकडून चालवला जातो. त्याशिवाय त्याने कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोमधील लक्झरी रिसॉर्ट्समध्येही गुंतवणूक केली आहे. सोबतच रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केलीये.
6 / 6
बिझनेसशिवाय पिअरे आपल्या उदार मनासाठी देखील जगभरात लोकप्रिय आहे. २००४ मध्ये त्याने पत्नीसोबत मिळून ओमिडयार नेटवर्कची सुरूवात केली होती. ही एक अशी संस्था आहे जी जगभरात सामाजिक सुधारणा कार्यांमध्ये मदत करते. आतापर्यंत या संस्थेने सामाजिक कार्यांसाठी १.५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त मदत केली आहे. पिअरे समाजसेवेच्या बाबतीत जगातील सगळ्यात दानशूर व्यक्तींपैकी एक आहे.
टॅग्स :Iranइराणbusinessव्यवसायInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स