PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:59 IST2025-05-02T08:45:59+5:302025-05-02T08:59:26+5:30
PPF Investment Hack: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय, सुरक्षित आणि करबचत गुंतवणुकीचा पर्याय आहे. १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी आणि आकर्षक व्याजदर यामुळे दीर्घ मुदतीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

PPF Investment Hack: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय, सुरक्षित आणि करबचत गुंतवणुकीचा पर्याय आहे. १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी आणि आकर्षक व्याजदर यामुळे दीर्घ मुदतीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
परंतु, तुम्हाला माहित आहे का की जेव्हा तुम्ही पीपीएफमध्ये पैसे जमा करता तेव्हा तुमच्या एकूण परताव्यात मोठा फरक पडू शकतो. होय, महिन्याच्या फक्त एका तारखेची काळजी घेऊन तुम्ही हजारो रुपयांचे अतिरिक्त व्याज मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया पीपीएफच्या या '५' तारखेच्या ट्रिकचं संपूर्ण गणित.
केंद्र सरकार लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. लोक या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करतात आणि त्यांच्या भविष्यासाठी पैसे जमा करतात. याद्वारे कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये (PPF Scheme Latest Update) देखील गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक महत्त्वाची माहिती माहित असणे आवश्यक आहे.
PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ५ तारखेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याची पाच तारीख लक्षात घेऊन तुम्ही पैसे जमा केले तर तुम्हाला होणारा नफाही वाढू शकतो. केंद्र सरकारनंही याबाबत जनतेला सूचना दिली होती. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या महिन्याच्या व्याजाचा लाभही मिळेल.
उदाहरणार्थ, जर तुम्ही २० एप्रिल रोजी पैसे जमा केले तर तुम्हाला फक्त ११ महिन्यांसाठी व्याज दिलं जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही ५ एप्रिलला गुंतवणूक केली तर तुम्हाला संपूर्ण १२ महिन्यांसाठी व्याजाचा लाभ मिळेल. यामध्ये जवळपास १०,६५० रुपये नफा होऊ शकतो. हा फक्त एका महिन्याचा फरक आहे. कल्पना करा, ५ तारखेनंतर दर महिन्याला किंवा वर्षाला एकरकमी रक्कम जमा केली, तर १५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत हा तोटा हजारो-लाखांपर्यंत पोहोचू शकतो.
समजा तुम्ही दरवर्षी १ एप्रिलला (५ तारखेपूर्वी) १,५०,००० रुपये जमा करता. त्या दीड लाख रुपयांवर तुम्हाला वर्षभरासाठी व्याज मिळेल. पण हेच दीड लाख रुपये जर तुम्ही ६ एप्रिलला जमा केले तर त्या दीड लाख रुपयांवरील व्याज तुम्हाला त्या आर्थिक वर्षात फक्त ११ महिन्यांसाठी प्रभावीपणे मिळेल, कारण एप्रिल महिन्याचं व्याज मिळणार नाही. १५ वर्षांत मोठा फरक पडेल.
जर तुम्ही दर महिन्याला पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान पैसे जमा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बँकेत ऑटो-डेबिट इन्स्ट्रक्शन सेट करू शकता.
जर तुम्ही वर्षातून एकदा पैसे जमा करत असाल तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान गुंतवणूक करणं चांगलं. यामुळे तुम्हाला वर्षभर जमा झालेल्या संपूर्ण रकमेवर व्याजाचा फायदा मिळेल.
पीपीएफ ही एक उत्तम गुंतवणूक आहे, परंतु छोट्या नियमांची काळजी घेऊन तुम्ही तुमचा परतावा आणखी वाढवू शकता. महिन्याच्या ५ तारखेपूर्वी गुंतवणूक करण्याची ही सोपी युक्ती तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता दीर्घ मुदतीत हजारो रुपयांचा नफा देऊ शकते. त्यामुळे पुढच्या वेळी पीपीएफमध्ये पैसे जमा करताना कॅलेंडरवर ५ तारीख मार्क करायला विसरू नका. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्षभरात जास्तीत जास्त ५ लाख रुपये जमा करता येतात. एखादी व्यक्ती केवळ एकदाच पीपीएफ खातं उघडू शकते.