Vodafone-Idea चा ६०० रूपयांपर्यंतचा प्लॅन Reliance Jio लादेखील देतो टक्कर; पाहा बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:48 PM2021-05-22T18:48:27+5:302021-05-22T18:53:18+5:30

Vodafone Idea : रिलायन्स जिओच्या तुलनेत व्होडाफोन आयडिया देतेय जबरदस्त बेनिफिट्स, पाहा काय मिळतंय या प्लॅनमध्ये खास.

सध्या कंपन्या बाजारात आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ यांसारख्या कंपन्या सातत्यानं काही नवनवे प्लॅन्स लाँच करताना दिसतात.

व्होडाफोन-आयडिया ही कंपनीदेखील अनेक जबरदस्त बेनिफिट्सवाले प्लॅन्स ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. यापैकीच एक आहे तो म्हणजे ६०१ रूपयांचा प्लॅन. यात मिळणारे बेनिफिट्स व्हॅल्यू फॉर मनी आहेत.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ हीदेखील व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनला टक्कर देऊ शकत नाही. पाहूया कंपनीच्या या प्लॅनमध्ये कोणती बेनिफिट्स मिळतात.

व्होडाफोन आयडिया या कंपनीचा हा प्लॅन ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसंच यात युझर्सना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना अतिरिक्त ३२ जीबी डेटाही देण्यात येतो.

या प्लॅनसह ग्राहकांना बिंज ऑल नाईट बेनिफिट्सही देण्यात येतं. यामध्ये ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ या कालावधीत आपल्या डेटा न वापरता इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा देण्यात येते.

याशिवाय ग्राहकांना अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभही कंपनीकडून देण्यात येतो. या प्लॅनमध्ये कंपनी अॅडिशनल बेनिफिट्सच्या रूपात Disney+ Hotstar चं सबक्रिप्शनही देतो.

ग्राहकांना ऑनलाइन कंटेंन्टशिवाय विकेंड डेटा रोलओव्हर सारखे बेनिफिट्सही मिळतात. याशिवाय युझर्सना या प्लॅनसोबत Vi Movies & TV चा मोफत अॅक्सेसही दिला जातो.

रिलायन्स जिओच्या तुलनेत व्होडाफोन आयडियाचा ६०० रूपयांचा प्लॅन ग्राहकांना अधिक बेनिफिट्स गेतो. यामध्ये अनेक सुविधा ग्राहकांना मिळतात.

रिलायन्स जिओच्या ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना नॉर्मल प्लॅन्सवाल्या सुविधा दिल्या जातात. जर तुम्हाला मोफत कॉलिंग, अतिरिक्त डेटा Vi Movies & TV, Disney+ Hotstar अशा सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर व्होडाफोन आयडियाचा हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

दुसरीकडे व्होडाफोन आयडियाचा हा Reliance Jio ला बेनिफिट्सच्या बाबती मागे सोडतो. रिलायन्स जिओच्या ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते.

रिलायन्स जिओ यासह ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे १६८ जीबी डेटा देते. याशिवाय ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचीही सुविधा देण्यात येते.

या प्लॅनमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचं झालं तर कंपनी जिओ टीव्हबी आणि जिओ सिनेमा याप्रमाणे अन्य अॅप्सचंही अॅक्सेस देते.