२०२० मध्ये मोदी सरकारने बंद केल्या या सहा कंपन्या, काही मोठ्या कंपन्यांचाही आहे समावेश

By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 09:04 AM2020-12-29T09:04:03+5:302020-12-29T09:15:13+5:30

Modi government : यामधील काही कंपन्या या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या त्या क्षेत्रात नामांकित होत्या. मात्र आता त्यांच्यावर टाळे लटकले आहे.

गेल्या काही काळात नुकसानीमध्ये असलेल्या अनेक सरकारी कंपन्या बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामधील काही कंपन्या या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या त्या क्षेत्रात नामांकित होत्या. मात्र आता त्यांच्यावर टाळे लटकले आहे.

सध्या केंद्र सरकार निर्गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात २.१० लाख कोटी रुपये एवढी रक्कम निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून उभारण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. मोदी सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या कंपन्यांमध्ये पुढील कंपन्यांचा समावेश आहे.

हिंदुस्थान फ्लुरोकार्बन लिमिटेड - Marathi News | हिंदुस्थान फ्लुरोकार्बन लिमिटेड - | Latest business Photos at Lokmat.com

हिंदुस्थान फ्लुरोकार्बन लिमिटेड - हिंदुस्थान फ्लुरोकार्बन लिमिटेड रसायन आणि पेट्रो रसायन विभागातील ही सरकारी कंपनी आहे. नुकसानीत चालत असलेली ही कंपनी बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना योग्य नुकसानभरपाई दिली जाईल. त्यासाठी सरकार कंपनीला ७७.२० कोटी रुपये बिनव्याजी देणार आहे. तसेच याची भरपाई कंपनीची जमीन आणि संपत्तीची विक्री करून केली जाईल.

स्कूटर्स इंडिया - Marathi News | स्कूटर्स इंडिया | Latest business Photos at Lokmat.com

स्कूटर्स इंडिया - देशाला लॅम्ब्रेटा, विजय डिलक्स आणि विजय सुपर सारख्या स्कूटर देणाऱ्या स्कूटर इंडिया लिमिटेड कंपनी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १९८० मध्ये स्कूटर इंडियाने बाजारात शेवटची स्कूटर लॉन्च केली होती. सध्या या कंपनीचे सर्व प्लँट बंद आहेत.

भारत पम्प अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड - Marathi News | भारत पम्प अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड | Latest business Photos at Lokmat.com

भारत पम्प अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड - भारत पंप्स अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड भारत सरकारच्या लघुरत्न कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी रेसिप्रोकेटिंग पम्प, सेन्ट्रिफ्युगल पम्प, रेसिप्रेकेटिंग कॉम्प्रेसर आणि उच्च दाब असलेले सीवनहीन गॅस सिलेंडर तयार करत असे. या कंपनीचे मुख्यालय अलाहाबाद येथे आहे.

हिंदुस्थान प्रीफॅब - Marathi News | हिंदुस्थान प्रीफॅब | Latest business Photos at Lokmat.com

हिंदुस्थान प्रीफॅब लिमिटेड भारताच्या सर्वात जुन्या सीपीएसईमधील एक कंपनी आहे. एचपीएलला १९४८ मध्ये एका विभागाच्या रूपात स्थापित करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवेळी पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या लोकांच्या राहण्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती.

हिंदुस्थान न्यूजप्रिंट लिमिटेड - Marathi News | हिंदुस्थान न्यूजप्रिंट लिमिटेड | Latest business Photos at Lokmat.com

हिंदुस्थान न्यूजप्रिंट लिमिटेड - हिंदुस्थान न्यूजप्रिंटला केरळमधील वेल्लूरमध्ये ७ जून १९८३ रोजी हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशन लिमिटेडला पूर्ण स्वामित्वाधीन सहाय्यक कंपनीच्या रूपात स्थापन करण्यात आले होते. १९९८ मध्ये एचएनएलने आकर्षक आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली न्यूजप्रिंट निर्मात कंपनी बनण्याचा मान मिळवला होता. आत कंपनीवर ताळे लटकलेले आहे.

कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड(केएपीएल) - Marathi News | कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड(केएपीएल) | Latest business Photos at Lokmat.com

कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड(केएपीएल) : 1984 मध्ये एका सामान्य सुरुवातीनंतर केएपीएलच्या विविध जीवन रक्षक आणि आवश्यक औषधांची निर्मिती आणि विपणनच्या क्षेत्रात भक्कमणे पाऊल पाऊल ठेवले होते. आयएसओ मान्यतेसह केएपीएलला घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गुणवत्ता आणि सेवेसाठी ओळखली जात होती.