शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरदार व्यक्तींसाठी या आहेत LICच्या बेस्ट पॉलिसी, विम्यासह मिळेल लाखोंचा लाभ

By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 1:38 PM

1 / 5
जीवन विमा हा एका सुरक्षित आणि स्वस्थ जीवनासाठी महत्त्वपूर्ण बनलेला आहे. दुर्दैवाने जीवनात एखादा अपघात झाल्यास किंवा अपमृत्यू झाल्यास जीवन वीमा पॉलिसी ही कुटुंबासाठी मदतगार ठरते. जर तुम्ही आपल्या कुटुंबात एकटे कमावणारे असाल आणि मासिक पगारावर काम करत असलात तर तुम्ही वीमा काढणे आणि अधिकच गरजेचे बनते. आज आपण जाणून घेऊया एलआयसीच्या पाच मोठ्या आणि उपयुक्त विमा पॉलिसीविषयी.
2 / 5
एलआयसीचा टेक टर्म प्लॅन ही एक ऑनलाइन विमा पॉलिसी आहे. ही पॉलिसी ऑफलाइन पॉलिसींपेक्षा स्वस्त आहे. ही एक नॉन लिंक्ड, विथाऊट प्रॉफिट प्योर प्रोटेक्शन ऑनलाइन टर्म पॉलिसी आहे. या पॉलिसीचा कालावधी १० ते ४० वर्षांपर्यंत आहे. या पॉलिसीचा लाब १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्ती घेऊ शकतात. यामध्ये लाइफ कव्हर रक्कम ५० लाख रुपये आहे. यामध्ये स्मोकर आणि नॉन स्मोकरसाठी वेगवेगळे प्रीमियम आहेत. ही एक नॉन मेडिकल स्कीम आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी एलआयसीच्या संकेतस्थळावरून थेट अर्ज करता येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला आवश्यक माहिती भरण्यासह पेमेंट करावं लागेल. याची कागदपत्रे पॉलिसीधारकाच्या पत्त्यावर पाठवली जातील.
3 / 5
एलआयसीच्या काही विमा पॉलिसी ह्या बचत करतात, तर काही जीवनाला संरक्षण देतात. मात्र एलआयसीच्या न्यू जीवन आनंद स्कीममध्ये दोन्हींचा समावेश आहे. यामध्ये बोनससुद्धा मिळतो आमि पॉलिसीच्या कालावधीनंतर रिस्क कव्हरसुद्धा कायम राहते. १८ ते ५० वर्षांपर्यंतच्या वयाच्या व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये किमान १ लाखांपर्यंत सम अॅशोर्ड आवश्यक अट आहे. मात्र तुम्ही यामध्ये यापेक्षा अधिक रकमेचा सम अॅशोर्डसुद्धा घेऊ शकता. या पॉलिसीचा अवधी १५ ते ३५ वर्षे आहे. ही पॉलिसी ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे घेता येऊ शकते. ही पॉलिसी घेतल्यानंतर ३ वर्षांनी तुम्ही या पॉलिसीच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकता.
4 / 5
एलआयसीची ही पॉलिसी एक प्योर टर्म प्लॅन आहे. यामध्ये लाइफ कव्हर निवडण्याचे दोन पर्यात आहेत. पहिला लेव्हल विमीत आणी दुसरा इन्किसिंग विमीत रक्कम आहे. यामध्ये वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत लाइफ कव्हर मिळते. जर पॉलिसीदरम्यान, धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमा रक्कम मिळते. ही एक ऑफलाइन विमा पॉलिसी आहे. या पॉलिसीमधून १८ ते ६५ वर्षांच्या वयामधील व्यक्तीच विमा घेऊ शकतात. यामध्ये किमान विमा रक्कम २५ लाख आहे तरेच कमाल रकमेची काहीही मर्यादा नाही आहे. या पॉलिसीचा अवधी १८ ते ४० वर्षे आहे.
5 / 5
एलआयसीची ही एक आजीवन विमा पॉलिसी आहे. तिला भागीदारी योजनासुद्धा म्हणतात. त्याचं कारण म्हणजे, यामध्ये फायनल अॅडिशन बोनससुद्धा मिळतो. यामध्ये प्रीमियम जमा करण्याच्या अवधीनंतर विमित रकमेच्या ८ टक्के लाभ आजीवन किंवा वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत मिळतो. तसेच यामध्ये प्रीमियम. मृत्यू लाभ आणि मॅच्युरिटी लाभावर टॅक्स लाभही मिळतो. ही पेन्शनधारकांसाठी एक चांगली योजना आहे. यामध्ये जोखीम कव्हरेज पॉलिसी जीवनाच्या अखेरीपर्यंत असते. तसेच आत्महत्येच्या परिस्थितीत पॉलिसीधारकाने जमा केलेल्या रकमेच्या ८० टक्क्यांपर्यंत रक्कम परत केली जाते.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकMONEYपैसाbusinessव्यवसाय