शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्पॅम कॉलचा त्रास होईल कमी, व्हॉट्सअपने आणलंय नवं फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 10:01 AM

1 / 9
प्रसिद्ध सोशल मीडिया एप आणि सर्वाधिक युजर्सं संख्या असलेल्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या फिचर्समध्ये सातत्याने अपडेट होत असते.
2 / 9
आपल्या युजर्संसाठी या कंपन्या नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच, युजर्संचा डेटा सुरक्षित ठेवणे आणि युजर्सं फ्रेंडली पद्धतीने कंपन्यांकडून काम होत असते.
3 / 9
व्हॉट्सअपवर गेल्या काही दिवसांपासून फेक कॉल आणि मेसेजचा युजर्संना मोठा त्रास होतोय. आता, कंपनीने या त्रासापासून युजर्संची सुटका केलीय.
4 / 9
व्हॉट्सअपकडून एक नवीन फिचर आणण्यात येत आहे. जे कुठल्याही अनोखळी नंबरसाठी म्युट कॉलची सेवा देतंय. या नवीन फिचरद्वारे अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलला म्युट केले जाऊ शकते.
5 / 9
तुमच्या कॉन्टॅक्ट लीस्टमधील कुठल्याही अनोळखी नंबरवरुन या फिचरद्वारे कॉल म्युट केला जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात स्मॅप कॉलिंगमध्ये वाढ झाल्याने कंपनीने हे नवीन फिचर आणले आहे.
6 / 9
व्हॉट्सअपकडून प्रथमच अनोळखी नंबरला ब्लॉक करण्याची सुविधा देण्यात येत आहे. मात्र, म्युट कॉल फीचर एक एडिशनल सेफ्टी फिचर देण्यात आलंय.
7 / 9
अकाऊंट बॅन होणे वाचवण्यासाठी व्हॉट्सअपने प्लॅटफॉर्म युजर्संसाठी एक प्रोटोकॉल शेअर केलाय. म्हणजे जर तुम्ही कोणाला ब्लॉक करु शकत नसाल तर, तो कॉल म्युट करण्याचा पर्याय युजर्संला मिळणार आहे.
8 / 9
WABetaInfo नुसार नवीन फीचर आता Android साठी WhatsApp बीटा पर डेवलप करण्यात येत आहे. त्यासोबतच, व्हॉट्सअपद्वारे एक नवीन फिचर देण्यात येणार आहे.
9 / 9
व्हॉट्सअप टॅबलेट्ससाठी हे नवं फिचर काम करण्यात येणार असून स्प्लिट व्यू असं याच नाव आहे. त्याद्वारे, मल्टीटास्कींग अतिशय सहज आणि सुलभ होणार आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMobileमोबाइल