शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३१ मार्चपूर्वी ही ५ कामं आटोपून घ्या, अन् टॅक्स वाचवा, होम लोनवर सवलत मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 1:16 PM

1 / 6
मार्च महिना सुरू झाला आहे. हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने या महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेक कामं आटोपून घेणं आवश्यक असतं. जर तुमची काही आर्थिक विषयक कामं पूर्ण करायची असल्यास आजच पूर्ण करून घ्या.
2 / 6
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी टॅक्स सेव्हिंगचा पर्याय निवडण्यासाठीची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४ आहे. ३१ तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार कर वाचवण्यासाठी योग्य योजनांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. जर तुम्ही या तारखेनंतर गुंतवणूक केली तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.
3 / 6
जर तुम्हाला होम लोनवर सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ३१ मार्च पर्यंतची वेळ असेल. एसबीआयकडून होम लोनमध्ये सवलतीसाठी विशेष स्कीम चालवली जात आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे.
4 / 6
रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या सेवेच्या अनेक सुविधांची कालमर्यादा वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने २९ फेब्रुवारी २०२४ पासून पेटीएम पेमेंट्स बँकेला नवे व्यवहार करण्यास मनाई केली होती. सध्या याची कालमर्यादा वाढवून १५ मार्च २०२४ करण्यात आली आहे.
5 / 6
UIDAI कडून फ्री अपडेशनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचा फायदा तुम्ही १४ मार्च २०२४ पर्यंत घेऊ शकता. या तारखेनंतर तुम्हाला आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावं लागेल.
6 / 6
तसेच तुम्ही फास्टॅग केवायसी ३१ मार्चपर्यंत पूर्ण करू शकता. त्याची डेडलाईन वाढवण्यात आली आहे. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून ही डेडलाईन वाढवण्यात आली आहे.
टॅग्स :TaxकरIncome Taxइन्कम टॅक्सMONEYपैसा