By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:31 IST
1 / 6आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्राप्तिकर अर्थात Income Tax भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जुन्या कर रचनेनुसार ७ लाख रुपयांपर्यंत आणि नवीन कर रचनेनुसार १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास टॅक्स भरावा लागतो. मात्र, देशात असे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत, ज्यावर सरकारला एक रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही. त्यांद्वारे होणारी संपूर्ण कमाई करमुक्त आहे.2 / 6शेतीतून मिळणारे उत्पन्न - जर तुम्ही शेती करत असाल, तर या उत्पन्नावर कोणताही कर अथवा टॅक्स आकारला जात नाही. पिकांची विक्री किंवा शेतजमिनीतून मिळणारे भाडे पूर्णपणे कराच्या कक्षेबाहेर आहे. मात्र, शेतीचे उत्पन्न ५००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर टॅक्स स्लॅब ठरवण्यासाठी याचा विचार केला जाऊ शकतो; तरीही प्रत्यक्ष शेती उत्पन्नावर टॅक्स लागत नाही.3 / 6ईपीएफ (EPF) मधून होणारी कमाई - एखाद्या कंपनीत सलग ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केल्यास, ईपीएफमधून काढलेली रक्कम करमुक्त असते. यामध्ये कर्मचारी आणि कंपनीचे योगदान तसेच व्याजावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.4 / 6पीपीएफ (PPF) वरील व्याज आणि मॅच्युरिटी: पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. यातील गुंतवणूक, त्यावर मिळणारे ७.१% व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. ही योजना 'EEE' (Exempt-Exempt-Exempt) मॉडलवर चालते. यात दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.5 / 6जीवन विमा पॉलिसी - जीवन विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर, मिळणारी रक्कम अथवा पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असतो. अट फक्त एवढीच की, प्रीमियम हा विमा राशीच्या (Sum Assured) १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.6 / 6सुकन्या समृद्धी योजना: मुलींच्या भविष्यासाठी असलेल्या या योजनेत गुंतवणुकीवर ८०सी अंतर्गत सवलत मिळते. यातील जमा रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीचे पैसे पूर्णपणे टॅक्स-फ्री असतात. महत्वाचे म्हणजे, या योजनेत आपण दरवर्षी ₹१.५ लाख पर्यंत जमा करू शकता.