शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 7:35 PM

1 / 11
सुमारे सहा दशकांनंतर Air India ची TATA ग्रुपमध्ये घरवापसी झाली. एअर इंडियाला पुन्हा एकदा सोनेरी दिवस आणण्यासाठी टाटा समूहाने कंबर कसली आहे. एअर इंडियामध्ये नाना प्रकारचे बदल केले जात आहेत. यंत्रणा अद्ययावत केल्या जात आहेत.
2 / 11
Air Indiaचे वेळापत्र, शिस्त यांबाबतही TATA मोठ्या प्रमाणात अचूक राहण्यावर भर देत आहे. यातच कर्जबाजारी कंपनी एअर इंडियाचे टाटा समूहात येताच दिवस पालटू लागले आहेत. एअर इंडियाची विमाने आता वेळेवर उड्डाण करण्यात खूप पुढे आहेत. त्यांचे केबिन क्रू देखील अधिक ग्राहक अनुकूल होत आहेत.
3 / 11
आता Air India कंपनी आपल्या वाइड बॉडी विमानांचे आधुनिकीकरण करणार आहे. त्याच्या आतील भागांचे आधुनिकीकरण करण्यासाठी तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ३३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे.
4 / 11
Air India कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी २७ बोईंग बी७८७-८ आणि १३ बी७७७ विमानांचे आतील भाग बदलणार आहे. आधुनिकीकरणाच्या या योजनेत सध्याच्या केबिनचे अंतर्गत भाग पूर्णपणे बदलले जातील. याचा अर्थ जुनी आसने अद्ययावत पिढीच्या आधुनिक आसनांनी बदलल्या जातील.
5 / 11
Air India विमाने आंतरराष्‍ट्रीय मार्गांवर चालत असल्याने सर्वोत्तम श्रेणीतील करमणुकीची सुविधा देण्यात येणार आहे. केबिन इंटिरियर डिझाइनमध्ये सहाय्य करण्यासाठी लंडनस्थित आघाडीच्या उत्पादन डिझाइन फर्म JPA डिझाइन आणि ट्रेंड वर्क्स यांना सामील करण्यात आले आहे.
6 / 11
TATA समूहला Air India मधील आधुनिकीकरणाची ही प्रक्रिया २०२४ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या वाइड बॉडी विमानांमध्ये प्रीमियम इकॉनॉमी केबिन नव्हत्या. आता टाटा समूहाने प्रीमियम इकॉनॉमी केबिन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 / 11
TATA समूहाची आणखी एक विमान कंपनी असलेल्या विस्तारामध्येही ही व्यवस्था आधीच अस्तित्वात आहे. या केबिनच्या निर्मितीमुळे अशा ग्राहकांना फायदा होईल. ज्या प्रवाशांना बिझनेस किंवा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी आपल्या खिशाला कात्री लावायची नाही, ते कमी खर्चात प्रीमियम सुविधेचा आनंद घेऊ शकणार आहेत.
8 / 11
Air India विमानांमध्ये प्रथम श्रेणीतील प्रवासी फारच कमी आहेत. त्यानंतरही एअर इंडियाच्या बी७७७ इड बॉडी विमानांमध्ये प्रथम श्रेणीची केबिन कायम ठेवली जाईल. विमान उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय मार्गांवर अनेक लोक फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देतात.
9 / 11
Air India ही देशाची ध्वजवाहक विमान कंपनी असल्याने काही विमानांमध्येही अशी व्यवस्था करावी लागणार आहे. आम्हाला खात्री आहे, की जेव्हा नवीन बदल सुरू होतील तेव्हा नवीन इंटिरिअर्स ग्राहकांना आनंद देऊ शकतील.
10 / 11
आमच्या Vihaan. एअर इंडिया परिवर्तन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एअर इंडिया जागतिक दर्जाच्या विमान कंपनीला साजेशी उत्पादने आणि सेवांचे उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले.
11 / 11
आम्हाला माहिती आहे की, सध्या आमच्या ४० वाइड बॉडी विमानांची केबिन उत्पादने या मानकापेक्षा कमी आहेत. हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी सुरू झाला असला तरी आता त्याची औपचारिक घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाRatan Tataरतन टाटाbusinessव्यवसाय