संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा ६०% हिस्सा खरेदी केला, बातमी येताच शेअर रॉकेट बनला; किंमत ₹२०० पेक्षाही कमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:08 IST
1 / 8शेअर बाजारातील वालचंदनगर इंडस्ट्रीजने (Walchandnagar Industries) मंगळवारी (4 मार्च) एक मोठी माहिती देली आहे. आपण डिफेन्स आर अँड डी स्टार्टअप Aicitta Intelligent Technology Private Ltd मधील ६० टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी खरेदी केल्याचे कंपनीने म्हटले आहे. 2 / 8यासाठी कंपनीला १६ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, या वृत्तानंतर, कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे.3 / 8कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने लागत होते लोअर सर्किट - गेल्या तीन व्यवहारांच्या दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने लोअर सर्किट लागत होते. मात्र, आज कंपनीकडून गुडन्यूज येताच कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत अप्पर सर्किट लागले. या तेजीनंतर, Walchandnagar Industries Ltd चा शेअर ₹१५४.०५ वर पोहोचला.4 / 8ही अधिग्रहण प्रक्रिया ३१ महिन्यांत अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्याचे अधिग्रहण ४५ से ६० दिवसांत होऊन जाईल.5 / 8अशी आहे शेअरची स्थिती - या शेअरची स्थितीही सध्याच्या बाजार स्थितीपेक्षा काही वेगळी नाही. गेल्या ३ महिन्यांत, वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर ४१ टक्क्यांनी घसरला आहे. तर, ६ महिन्यांत या शेअरची किंमत ५२ टक्क्यांनी घसरली आहे. 6 / 8महत्वाचे म्हणजे, कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४३८ रुपये एवढा आहे. तर नीचांकी पातळी १४२.९५ रुपये एवढी आहे.7 / 8महत्वाचे म्हणजे, गेले एक वर्षाचा कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी चांगले गेले नसले तरी, कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना २ वर्षात १५७ टक्के एवढा फायदा झाला आहे. तर ३ वर्षांत १९८ टक्के एवढा परतावा देण्यात हा शेअर यशस्वी ठरला आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)