शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹1 च्या शेअरची कमाल, सातत्याने करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांच्या उड्या, LIC नंही लावलाय मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 1:54 AM

1 / 8
शेअर बाजारात गेल्या शुक्रवारच्या चढ-उतारा दरम्यान काही पेनी स्टॉक्सना जबरदस्त मागणी होती. असाच एक पेनी शेअर टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित क्वाड्रंट टेलिकॉम लिमिटेडचा आहे. या पेनी शेअरला 10 टक्क्यांचे अपर सर्किट लागले आहे.
2 / 8
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात शुक्रवारी क्वाड्रंट टेलिकॉम लिमिटेडच्या शेअरची किंमत 1.95 रुपये होती. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर गेल्या जुलै महिन्यात या शेअरचा भाव ०.७५ पैशांपर्यंत घसरला होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक होता.
3 / 8
गेल्या एका आठवड्यात या शेअरने बीएसईच्या तुलनेत 44 टक्के एवढा सकारात्मक परतावा दिला आहे. तर एका महिन्याचा परतावा 57 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच, गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत या शेअरने जवळपास 100 टक्के एवढा परतावा दिला आहे.
4 / 8
शेअरहोल्डिंग पॅटर्न - डिसेंबरपर्यंत क्वाड्रेंट टेलीकॉम लिमिटेडमध्ये प्रवर्तकांचा वाटा 51.32 टक्के एवढा होता, तर पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 48.68 टक्के हिस्सेदारी होती. प्रवर्तकांमध्ये क्वाड्रेंट एंटरप्रायजेस लिमिटेड, निप्पॉन इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, तसेच टेककेअर इंडियाचाही समावेश आहे.
5 / 8
एलआयसीचीही हिस्सेदारी - लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC ची क्वाड्रंट टेलिकॉम लिमिटेडमध्येही हिस्सेदारी आहे. विमा कंपनीकडे 10,76,2205 शेअर्स आहेत. तसेच, कोटक महिंद्रा बँकेकडे कंपनीचे 1,16,98,980 शेअर्स आहेत.
6 / 8
डिसेंबर तिमाहीचे निगकाल - क्वाड्रंटने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गेल्या तिमाहीच्या तुलनेत महसूल 5.89% आणि तोटा 0.06% ने कमी झाला आहे. तर, नेट लॉस 27.63 कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षाच्या याच कालावधीत रु. 29.53 कोटी एवढा होता. तसेच, विक्रीमध्ये 33.51% ची घसरण झाली असून ती 64.94 कोटी रुपये होती.
7 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकLIC - Life Insurance Corporationएलआयसी