चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:46 IST
1 / 8आपण चांदीच्या वाढत्या किमती पाहून त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा! प्रसिद्ध लेखक तथा गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीच्या गुंतवणूकदारांना मोठा इशारा दिला आहे. 2 / 8'कदाचित चांदीचे दर आता आपल्या पीकवर पोहोचले आहेत. यात आता आणखी तेजी येण्यापूर्वी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे,' असे कियोसाकी यांनी म्हटले आहे.3 / 8कियोसाकी यांनी एक्सवर लिहिले, 'मी जे बोलत आहे त्यावर ठाम आहे. मी १०० डॉलर्सपर्यंत चांदी खरेदी करेन आणि वाट बघेन.' सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदी ८५ डॉलर्स प्रति औंसच्या आसपास आहे. 4 / 8त्यांनी पुढे सांगितले, 'जर चांदी घसरली तर आपण संयम बाळगू आणि स्पष्ट संकेत मिळण्याची प्रतीक्षा करू. आपण १९६५ मध्ये पहिल्यांदा १ डॉलर प्रति औंस दराने चांदी खरेदी केली होती. १९९० च्या सुमारास ती ४ ते ५ डॉलर्सपर्यंत पोहोचली. तेव्हा आपण हिचे कट्टर समर्थक बनलो.5 / 8चांदी विकणाऱ्यांसाठी खास संदेश - कियोसाकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चांदी विकणाऱ्यांनाही खास संदेश दिला आहे. ते म्हणाले, 'चांदीची किंमत वाढलयाने अनेक छोटे गुंतवणूकदार ती विकत आहेत. त्यांच्या मते यामुळे चांदीच्या बाजारात घसरण येऊ शकते. एवढेच नाही तर, आपण आपल्या चांदीचे रुपांतर सोन्यात करण्याचा विचार करत आहोत.'6 / 8कियोसाकी १२ जानेवारी रोजी म्हणाले होते, 'चांदी खरेदी करायला खूप उशीर झाला आहे का? मी म्हणतो नाही.' 7 / 8खरे तर, चांदीकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्यानंतर, कियोसाकी यांनी ही टिप्पणी केली आहे. भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या या काळात, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत आहेत.8 / 8आज चांदीची? - आज, मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता, चांदी प्रति किलो २,७०,१०१ रुपयांवर व्यवहार करत होती आणि १,१३१ रुपयांची वाढ झाली होती.