राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Credit Card वरून घरभाडं भरावं की नाही? नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 10:58 IST
1 / 6Credit Card Payment : सर्व प्रकारच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. एक काळ असा होता की क्रेडिट कार्डचा वापर फक्त मोठ्या खरेदीसाठी केला जायचा. जरी, आजकाल क्रेडिट कार्डचा वापर किराणा खरेदीपासून ते कॅब पेमेंटपर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो, परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या घराचे महिन्याचे भाडे भरण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरावे का?2 / 6घरभाडे भरणे हा तुमच्या सर्वात महत्त्वाच्या खर्चांपैकी एक आहे. परंतु घरभाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर करणे देखील वाईट कल्पना असल्याचे सिद्ध होऊ शकते. याचीही काही कारणेही तशीच आहेत.3 / 6भाडे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचा सर्वात मोठा दोष म्हणजे तुम्ही पेमेंट चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खाली जाऊ शकतो. तथापि, जर तुमची सर्व क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली गेली, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. दुसरीकडे, जर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली गेला तर इतर अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागू शकते.4 / 6तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे जितके जास्त व्यवहार कराल, तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो तितकाच जास्त असेल. अशातच घरभाडे तुमच्यासाठी एक मोठा खर्चही असेल. क्रेडिट बिल वेळेवर न भरता दर महिन्याला तुमचे क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरण्याची सवय लागल्यास रेडिट बॅलन्सची समस्या निर्माण होईल. दुसरीकडे एवढ्या मोठ्या मासिक खर्चामुळे तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतच जाईल. जर तुमचे प्रमाण निर्धारित क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल.5 / 6क्रेडिट कार्डवर व्याज जास्त आकारले जाते हे नाकारता येत नाही. अर्थात, तुम्हाला व्याजमुक्त परतफेडीचा कालावधी मिळतो परंतु त्याच वेळी तुमचं बिल दिलेल्या कालावधीत फेडणे आवश्यक आहे. बिल भरण्यास विलंब झाल्यास व्याजात आणखी वाढ होईल. अशा परिस्थितीत तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला तुमच्या भाड्यापेक्षा जास्त व्याज द्यावे लागू शकते.6 / 6तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरता तेव्हा सर्व कारणे मर्यादित असतात. तुम्ही वेळेवर पेमेंट करण्यास वचनबद्ध असल्यास तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरून तुमचे घरभाडे भरू शकता. त्याच वेळी, काही बँका आहेत ज्या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारतात.