याला म्हणतात धमाका! 89 पैशाचा शेअर थेट ₹195 वर पोहोचला, करतोय मालामाल; आता कंपनी मोठा निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 04:21 PM2024-02-23T16:21:12+5:302024-02-23T16:26:29+5:30

कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठ्या घोषणेनंतर आली आहे.

कमोडिटी केमिकल्स इंडस्ट्रीशी संबंधित Grauer & Weil कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. गुरुवारी Grauer & Weil चा शेअर 20 टक्क्यांच्या तेजीसह 195.95 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठ्या घोषणेनंतर आली आहे.

खरे तर, ग्राउर अँड वील आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या बोर्डाची बैठक 26 फेब्रुवारीला होणार आहे. याच बैठकीत बोनस शेअर देण्यास मंजुरी मिळणार आहे. ग्राउर अँड वीलचे शेअर घेल्या काही वर्षांत 89 पैशांवरून थेठ 195 रुपयांवर पोहोचले आहेत.

शेअर्समध्ये 21000% ची उसळी - ग्राउर अँड वील (Grauer and Weil) कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 21 फेब्रुवारी 2003 लोजी केवळ 89 पैशांवर होता. तो 22 फेब्रुवारी 2024 रोजी 195.95 रुपयांवर पोहोचला.

या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 21000 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 21 फेब्रुवारी 2003 रोजी ग्राउर अँड वीलच्या शेअर्समध्ये 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती तर, आता त्यांच्या शेअर्सची व्हॅल्यू 22 लाख रुपयांपेक्षाही अधिक असती.

शेअरमध्ये गेल्या 10 वर्षांत 3100% हून अधिकची तेजी - ग्राउर अँड वीलच्या शेअरमध्ये गेल्या 10 वर्षांत तुफान तेजी दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर 3100 टक्क्यांनी वधारले आहेत. ग्राउर अँड वीलचे शेअर 28 फेब्रुवारी 2014 रोजी 5.85 रुपयांवर होते. ते 22 फेब्रुवारी 2024 ला 195.95 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या 4 वर्षांचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये 500 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. या कालावधीत ग्राउर अँड वीलचे शेअर 31.65 रुपयांवू 195.95 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 88.85 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)