शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक बातमी अन् शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹180 वर पोहोचला भाव, काय म्हणते कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 3:17 PM

1 / 7
शेअर बाजारात आज नायकाच्या शेअरमध्ये 8% पर्यंतची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर आज 180.85 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. शेअरच्या या तेजी मागे एक मोठे कारण आहे.
2 / 7
खरे तर, नायकाला Q4 मध्ये मोठा नफा होईल, अशी आशा आहे. यामुळे, आज नायकाची मूळ कंपनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्सची जबरदस्त करेदी होत आहे.
3 / 7
काय म्हणते कंपनी? - आपल्याला जानेवारी-मार्च तिमाही दरम्यान रेव्हेन्यूमध्ये 'हाय ट्वेन्टी' वार्षिक ग्रोथची आशा आहे, असे कंपनीने नव्या बिझनेस रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ब्यूटी आणि पर्सनल केअर सेगमेंटसाठी, नायकाची ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू (GMV) वार्षिक आधारावर 30% ने वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, कंपनीला सेल्स व्हॅल्यूमध्येही 25% पर्यंत ग्रोथ होण्याची अपेक्षा आहे.
4 / 7
महत्वाचे म्हणजे, डिसेंबर तिमाहीत नायकाचा नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर दुप्पट झाला आहे. तसेच, गेल्या वर्षाच्या तुलनेत रेव्हेन्यूमध्येही 22% ची वृद्धी झाली आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी (EBITDA) पूर्वी हिच्या कमाईचे मार्जिनही गेल्या डिसेंबर महिन्यात 5.3% ने वाढून 5.5% झाले होते.
5 / 7
2021 आला होता IPO - नायकाचा आयपीओ 2021 मध्ये आला होता. तेव्हा त्याचा प्रराइस बँड 1125 रुपये निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, कंपनीने 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स देखील दिले आहेत.
6 / 7
गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 25% ने, तर गेल्या एका वर्षात 40% ने वधारला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा शेअर आणखी वधारून 195 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक