शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI Credit Card Rules : एसबीआयने क्रेडिट कार्ड संबंधित नियम बदलले, तुम्हीही वापरत असला तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 12:49 PM

1 / 7
नवी दिल्ली : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड (SBI Card) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसने (SBI Cards & Payment Services) 1 मे 2023 पासून काही नियम बदलले आहेत.
2 / 7
बँकेने आपल्या वेबसाइटवर याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस अनेक क्रेडिट कार्ड जारी करतात आणि कार्डच्या प्रकारानुसार ऑफर वेगवेगळ्या असतात. त्यामुळे क्रेडिट कार्डमध्ये झालेले लेटेस्ट बदल कोणते? ते जाणून घ्या...
3 / 7
1) SBI कार्डच्या वेबसाइटनुसार, 5 लाख रुपये माइलस्टोन खर्चावर ऑरम (AURUM) कार्डधारकांना आता आरबीएल लक्सकडून 5 हजार रुपयांचे कूपन मिळणार नाही. मात्र याव्यतिरिक्त 1 मे, 2023 पासून Tata CLiQ Luxury कडून व्हाउचर मिळेल.
4 / 7
2) 1 मेपासून ऑरम कार्डमध्ये ईजीडायनर प्राइम आणि लेंसकार्ट गोल्ड मेंबरशिपचे बेनिफिट मिळणार नाहीत.
5 / 7
3) SimplyClick SBI कार्ड आणि SimplyClick Advantage द्वारे रेंट पेमेंट ट्रांजेक्शनवर 1 मे 2023 पासून 5X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी 1X रिवॉर्ड पॉइंट मिळत आहेत.
6 / 7
4) 1 एप्रिल 2023 पासून, SBI कार्डने SimplyClick SBI कार्ड आणि SimplyClick Advantage सह Lenskart ऑनलाइन शॉपिंगवर 10X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुमच्या कार्डवर अजुनही Apollo 24X7, Bookmyshow, Cleartrip, EasyDiner आणि Netmeds वरून ऑनलाइन खरेदीवर 10X रिवॉर्ड पॉइंट मिळतील.
7 / 7
5) कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर प्रोसेसिंग फी वाढवली आहे. SBI कार्डने यूजर्सना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगितले होते की, आता त्यांना 99 रुपये + टॅक्सऐवजी 199 रुपये + टॅक्स भरावा लागेल. हे नियम 17 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत.
टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाbankबँक