Rules Change: टोल, CNG-PNG पासून हवाई प्रवास दरवाढीची शक्यता; १ एप्रिल २०२५ पासून होणार १० मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:47 IST2025-03-31T11:13:28+5:302025-03-31T11:47:32+5:30

आज मार्च महिन्याचा अखेरचा दिवस, उद्या १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक मोठे बदल लागू होतात. ज्याचा प्रत्येकाच्या खिशावर परिणाम होतो. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडर किंमती, बँक खाते, डेबिट कार्डपासून क्रेडिट कार्ड यांचा समावेश आहे. इतकेच नाही हायवेवर प्रवास करणं महागडं ठरू शकते कारण अनेक मार्गावर टोल टॅक्स वाढणार आहे. जाणून घेऊया १० मोठे बदल

LPG सिलेंडर दर - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल अँन्ड गॅस पुरवठादार कंपन्या एलपीजी सिलेंडरचे दर ठरवत असतात. १ एप्रिलला त्या दरात बदल झालेले दिसतील. मागील काळात १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमतीत चढउतार दिसून आला. दीर्घ काळापासून घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. परंतु नव्या आर्थिक वर्षात १४ किलो सिलेंडरचे दरात घट होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

CNG, PNG दर - एलपीजी सिलेंडरशिवाय सीएनजी आणि पीएनजी किंमतीत पहिल्या तारखेला बदल पाहायला मिळू शकतात. तर कंपन्यां एअर टर्बाइन फ्यूल म्हणजे ATF चे दर १ एप्रिल २०२५ पासून बदलण्याची शक्यता आहे. सीएनजी किंमतीत चढउतारामुळे वाहनावरील खर्चात वाढ किंवा घट होतील. तर एटीएफ किंमती वाढल्या तर हवाई प्रवास महागण्याची शक्यता आहे.

UPI ID बंद होणार - १ एप्रिल २०२५ पासून यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI निगडीत बदल पाहायला मिळतील. ज्या मोबाईल नंबरवरील यूपीआय दीर्घ काळापासून सक्रीय नाहीत, ते बँक रेकॉर्डवरून हटवले जातील. जर तुमचा फोन यूपीआयला जोडला असेल आणि तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर ती सेवा बंद होऊ शकते.

Debit Card - रूपे डेबिट सेलेक्ट कार्डमध्ये काही मोठे बदल अपेक्षित आहेत जे १ एप्रिलपासून लागू होतील. फिटनेस, वेलनेस, प्रवास आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. एका तिमाहीत कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाऊंड विजिट आणि निवडक लाऊंजसाठी १ वर्षात २ आंतरराष्ट्रीय लाऊंज सुविधा मिळेल. त्याशिवाय दुर्घटना झाल्यास किंवा कायमचं दिव्यांग झाल्यास १० लाख रूपयांपर्यंत पर्सनल एक्सिडेंट कव्हर मिळेल. प्रत्येक तिमाहीत एक फ्री जिम मेंबरशिप मिळेल.

UPS ची सुरुवात - नव्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना गॅरेंटेड पेन्शन देणाऱ्या यूनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजे UPS ची सुरूवात होणार आहे. १ एप्रिलपासून केंद्रीय सरकारी कर्मचारी त्यात अर्ज करू शकतात. जर कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत पेन्शन हवी असल्यास ते यूपीएस पर्याय निवडून क्लेम फॉर्मवर भरू शकतात. जे UPS निवडणार नाहीत त्यांना NPS पर्याय आहे. यूपीएस अंतर्गत किमान १० हजार दर महिना पेन्शन मिळेल.

TAX स्लॅबशी निगडीत नियम - २०२५ च्या अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गीयांना दिलासा देत मोठ्या घोषणा केल्या. ज्यात टॅक्स स्लॅबमध्ये बदलापासून टीडीएस, टॅक्स रिबेट, अन्य गोष्टींचा समावेश आहे. नव्या टॅक्स स्लॅबमध्ये वर्षाला १२ लाख रूपये कमावणाऱ्यांना आयकरातून सूट दिली आहे. ७५ हजार स्टँडर्ड डिडक्शनासाठी ते पात्र असतील. म्हणजे १२.७५ लाख वार्षिक वेतनावर टॅक्समधून सवलत देण्यात आली आहे.

TDS मध्ये बदल - TDS नियम अपडेट करण्यात आले असून अनावश्यक कपात कमी करण्यासाठी आणि टॅक्सपेयर्ससाठी कॅश फ्लो सुधारण्यासाठी टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी व्याज दरावर लागणारा टीडीएस मर्यादा दुप्पट करत १ लाखापर्यंत करण्यात आली आहे. ज्यातून वृद्धांना आर्थिक सुरक्षा मिळाली आहे. त्याशिवाय भाड्याच्या उत्पन्नावर मर्यादा वाढवून ६ लाखापर्यंत करण्यात आली आहे. ज्यातून घर मालकावरील बोझा कमी झाला आहे.

क्रेडिट कार्ड नियम - १ एप्रिल पासून बदलणाऱ्या नियमामुळे क्रेडिट कार्डमधून मिळणाऱ्या रिवार्डपासून अन्य सुविधांवर परिणाम होईल. एकीकडे एसबीआयने SimplyClick क्रेडिट कार्डवर Swiggy रिवार्ड ५ पटीने कमी करून निम्मा केला आहे. तर AIR INDIA सिग्नेचर पॉईंट्स ३० हून कमी करत १० केले आहेत. त्याशिवाय IDFC First बँकेकडून क्लब विस्तारा माइलस्टोनचे फायदे बंद होणार आहेत.

बँक खात्यात बदल - १ एप्रिलपासून भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँकसह अन्य बँक ग्राहकांच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलेन्सशी निगडीत सुधारणा होणार आहे. बँकेद्वारे खातेधारक मिनिमम बॅलेन्ससाठी सेक्टर वाइज आधार नवी मर्यादा निश्चित केली जाईल. बँकेत बॅलेन्स खाते कमी असेल तर त्यावर दंड लागू शकते.

टोलचे दर वाढणार - नॅशनल हायवे अथॉरिटी ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून टोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम महामार्गावरील प्रवासावर होईल. NHAI ने विविध टोलचे दर वाढवले आहेत. त्यात लखनौहून जाणाऱ्या हायवेवर ५ रूपयांनी टोलचे दर वाढवले आहेत तर अवजड वाहनांचे दर २०-२५ रूपये वाढू शकतात. लखनौ-कानपूर,अयोध्या,रायबरेली,बाराबंकीसारख्या महामार्गावरील अनेक टोलचे दर वाढवले जातील. त्याशिवाय दिल्ली मेरठ एक्सप्रेस, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस, एनएच ९ वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोल टॅक्सचे दर जास्त द्यावे लागतील.