शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

​लाडक्या लेकीवर मुकेश अंबानी यांचा मोठा विश्वास, आणखी एका कंपनीची जबाबदारी सोपवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 2:36 AM

1 / 7
रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries Limited) सर्वे सर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आपल्या कंपन्यांची धुरा आता हळू-हळू आपल्या मुलांकडे सोपवत आहेत. रिलायन्स जिओची (Reliance Jio) धुरा आकाश अंबानीकडे (Aakash Ambani), रिलायन्स रिटेलची (Reliance Retail) जबाबदारी ईशा अंबानीकडे (Isha Ambani), तर पेट्रो केमिकलचा कारभार अनंत अंबानीकडे (Anant Ambani) सोपवण्यात आला आहे.
2 / 7
याशिवाय, आता मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या लेकीवर अर्थात ईशा अंबानी पिरामलवर मोठा विश्वास टाकत तिच्याकडे आणखी एका कंपनीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
3 / 7
लाडक्या लेकीवर मुकेश अंबानी यांचा विश्वास...- मुकेश अंबानी आपल्या कंपन्यांचे कामकाज हळू-हळू आपल्या मुलांकडे सोपवत आहेत आणि त्यांची मुलंही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहेत. ईशा अंबानी हिच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेल जबरदस्त ग्रोथ करत आहे.
4 / 7
मुकेश अंबानी यांनी ईशाकडे आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी ईशा अंबानीची रिलायन्सची फायनान्शिअल कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे डायरेक्टर पदी नियुक्ती केली आहे.
5 / 7
रिलायन्सने अपनी फाइनांन्शिअल सर्व्हिस वेगळी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिओ फायनांन्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडला बाजारात लिस्ट करण्याची तयारी सुरू आहे.
6 / 7
​ईशाकडे आणखी एक जबाबदारी -​ महत्वाचे म्हणजे, आतापर्यंत या कंपनीला रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड अर्थात आरएसआयएल नावाने ओळखले जात होते. आता हिला वेगळे करून जेएफएसएल नाव देण्यात आले आहे. या कंपनीची धुरा ईशा सांभाळेल.
7 / 7
ईशा अंबानीने रिलायन्स रिटेलला एका नव्या उंचीवर नेले आहे. ईशाच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेलचे व्हॅल्यूएशन 111 अब्ज डॉलरच्याही पुढे गेले आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीIsha Ambaniईशा अंबानी