Reliance Jio चे जबरदस्त प्लॅन्स; एकदा रिचार्ज करा, मिळणार वर्षभर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:19 PM2022-05-10T15:19:56+5:302022-05-10T15:25:41+5:30

रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक जबरदस्त प्लॅन्स आहेत.

रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक जबरदस्त प्लॅन्स आहेत. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅन्स ऑफर करते. Jio च्या पोर्टफोलिओमध्ये 4G टॉप-अप व्हाउचरपासून ते अॅन्युअल डेटा प्लॅनपर्यंत सर्व प्लॅन्स आहेत.

तुम्ही जर Jio च्या लाँग व्हॅलिडिटी प्रीपडे प्लॅन्सबद्दल विचारात असाल तर जिओ चांगला प्लॅन ऑफर करत आहे. कंपनी अशा तीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते ज्यांची वैधता एक वर्षाची आहे.

या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. पाहूया या प्लॅन्समध्ये काय मिळतंय खास. जिओ लाँग टर्म व्हॅलिडिटीमध्ये २५४५ रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे.

ग्राहकांना २५४५ रुपयांमध्ये एका वर्षाचं नाही, तर ३३६ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०४ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या अंतर्गत दररोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो.

ग्राहकांना यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटिज आणि जिओ क्लाऊडचंही सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एका वर्षाची वैधता असलेला प्लॅनही सामिल आहे. यासाठी तुम्हाला २८७९ रुपये खर्च करावे लागतील. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याचाच अर्थ ग्राहकांना एकून ७३० जीबी डेटा मिळतो. यआशिवायत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभही घेता येतो.

कंपनी आणखी एक क्रिकेट प्लॅनही ऑफर करते. हा प्लॅन डिस्ने + हॉटस्टार सोबत येतो. याची किंमत २९९९ रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना एकूण ९१२.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दरररोज १०० एसएमएसही मिळतात.