शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छोट्या व्यवसायिकांसाठी Reliance Jio नं आणले स्वस्त ब्रॉडबॅन्ड प्लॅन्स; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 8:43 PM

1 / 10
JioBusiness नं सूक्ष्म. लघू आणि मध्यम व्यवसायांसाठी काही नवे ब्रॉडबँड प्लॅन्स लाँच केले आहेत. हे प्लॅन्स एन्टरप्राईझ ग्रेड फायबर कनेक्टिव्हीटीसोबत येणार असन त्यात कॉलिंग आणि डेटा दोन्हीचा लाभ घेता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
2 / 10
याव्यतिरिक्त JioBusiness अंतर्गत कंपनी डिजिटल सोल्युशनदेखील देणार आहे. यामुळे व्यवसायिकांना आपल्या व्यवसायाचं नियोजन आणि त्याच्या वाढीसाठीही मदत मिळेल.
3 / 10
अन्य टेलिकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत कंपनी डिजिटल सोल्युशनसह ब्रॉडबँड आणि व्हॉईल कॉलिंग प्लॅनसह ५० टक्के कमी दरात ही ऑफर आणत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
4 / 10
सूक्ष्म किंवा लघू उद्योग कनेक्टिव्हीटी, ऑटोमेशन आणि प्रोडक्टिव्हीटी टूल्सवर दर महिन्याला १५ ते २० हजार रूपयांचा खर्च करतात. परंतु या क्षेत्राच्या मदतीसाठी जिओ सर्व सेवा १० टक्के कमी दरात घेऊन आल्याचं कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
5 / 10
छोट्या व्यवसायिकांसाठी जिओनं ९०१ रूपयांचा ब्रॉडबँड आणि कॉलिंग सर्व्हिस प्लॅन आणला आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना १०० एमबीपीएसचा अपलोड आणि डाऊनलोड स्पीड मिळणार आहे.
6 / 10
याशिवाय एक अनलिमिटेड कॉलिंगवालं ब्रॉडबॅन्ड कनेक्शनही देण्यात येणार आहे. हा प्लॅन एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येईल.
7 / 10
याव्यतिरिक्त जिओनं ५००१ रूपयांचाही प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ब्रॉडबॅन्ड आणि व्हॉईस कॉलिंगशिवाय सर्व आवश्यक डिजिटल सोल्युशनही देण्यात येणार आहेत.
8 / 10
या प्लॅनसाठी ग्राहकांना महिन्याला ५००१ रूपये द्यावे लागतील. यामध्ये १ जीबीपीएसपर्यंत स्पीड, ब्रॉडबॅन्ड कनेक्शन, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसाठी ४ लाईन्स. यामध्ये फिक्स्ड मोबाईल कनव्हर्जन्ल आणि स्टॅटिक आयपीचा समावेश असेल.
9 / 10
तसंच व्यावसायिकांसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप्स, वन ड्राईव्ह, टीम्स आणि अन्य १० लायसन्सदेखील देण्यात येतील. कर्मचाऱ्यांवर यासोबत जिओ अटेंडन्सचा अॅक्सेसही देण्यात येईल.
10 / 10
याद्वारे छोट्या व्यवसायिकांना मदत करण्यात येणार आहे. तसंच ते आपला व्यवसाय व्यवस्थितरित्या चालवतील आणि पुढे जातील यासाठई मदत केली जाणार असल्याचं जिओ बिझनेसबद्दल बोलताना आकाश अंबानी यांनी सांगितलं.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओbusinessव्यवसायInternetइंटरनेटSmall Businessesलघु उद्योग